शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Shravan 2021 : सेल्फी नको, दोन शब्द हवेत; याची जाणीव करून देणारा 'मातृदिन'!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 4:33 PM

Shravan 2021 : आजच्या दिखाऊ बेगडी काळात नात्यातला ओलावा हरवत चालला आहे. तो परत यावा यासाठी आपल्या संस्कृतीने करून दिलेली आठवण!

श्रावण अमावस्येला आपण 'मातृदिन' साजरा करतो. यंदा तो सोमवारी ६ सप्टेंबर ला आहे. काही जणांना पाश्चात्यांच्या 'मदर्स डे' वरून मातृदिन हा सण घेतला आहे असे वाटते. परंतु तसे नसून ही प्रथा अतिप्राचीन आहे. आपल्याकडे जन्मदात्या आई वडिलांना देवापेक्षाही मोठे स्थान दिले गेले आहे. `मातृदेवो भव', 'पितृदेवो भव' हा संस्कार पूर्वापार चालत आला आहे. अशा आपल्या जन्मदात्रीप्रती कृतज्ञता म्हणून श्रावण अमावस्येला `मातृदिन' साजरा केला जातो. 

Shravan Vrat 2021 : मुलाबाळांना दीर्घायुष्य मिळवून देणारी पिठोरीची अमावस्येची  कहाणी!

आपल्याकडे माता पित्यांची आज्ञा पाळणाऱ्या, त्यांच्यासाठी सर्व सुखांचा प्रसंगी जिवाचा त्याग करणाऱ्या व्यक्तींकडे आदर्श आणि आदरणीय म्हणून पाहिले जाते. सावत्र आई कैकयीची आज्ञा  आणि वडिलांची तिला दिलेल्या वचनांची पूर्ती व्हावी म्हणून प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षांचा वनवान स्वत:हून स्वीकारला होता. अंध माता पित्यांना कावडीत बसवून श्रावणबाळाने तीर्थयात्रा घडवली. भक्त पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत असताना पांडुरंग आले, तरी अर्धवट सेवेतून उठला नाही. तर पांडुरंगाला थोड्यावेळ थांब म्हणवून विनवणी केली. वडिलांच्या सुखासाठी आणि सावत्र आईचा संशय दूर करण्यासाठी देवव्रताने भीष्मप्रतिज्ञा केली. अशी असंख्य उदाहरणे संस्कृतीच्या विशाल पूर्वइतिहासात सापडतात. 

आजच्या काळात आई आणि मुलांचे नाते दुरावत चालले आहे. मदर्स डे उत्साहात साजरा करणारी मुलं आईबरोबर सेल्फी काढून सोशल मिडीयावर झळकतात. तिथल्या कमेंटला रिप्लाय देतात, परंतु आईशी दोन शब्दही बोलत नाहीत, ही घरोघरी असलेल्या आईची व्यथा आहे. ज्यांनी जन्म दिला त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहिले पाहिजे आणि प्रत्येक दिवस हा मातृ पितृ दिन म्हणून साजरा केला पाहिजे, याची जाणीव करून देण्यासाठी हे निमित्त आहे. 

या दिनाचे महत्त्व जाणून घेत आपणही आपल्या आई-वडिलांचा  आदर कायमस्वरूपी ठेवला पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे. त्यांनी आपला सांभाळ केला, तसा आपण त्यांच्या उतारवयात सांभाळ केला पाहिजे. या सर्व जबाबदारींची जाणीव करून घेत मातृदिन साजरा केला पाहिजे. आजच्या दिवशी पिठोरी अमावस्येचे व्रत केले जाते. समस्त माता हे व्रत आपल्या लेकरांना सुदृढ, निरोगी दीर्घायुष्य मिळावे म्हणून करतात. जर आई मुलांसाठी व्रत करू शकते, तर आपणही तिच्याशी चांगले वागून, काळजी घेऊन, प्रेम देऊन मातृदिन साजरा करायला हवा ना...?

Shravan Vrat 2021 : संततीविषयक दोष निवारणारे 'पिठोरी अमावस्येचे' प्रभावी व्रत थोडक्यात समजून घेऊ!

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल