व्रत-वैकल्ये आणि सण-उत्सवांचा राजा मानला गेलेला श्रावणमास सुरू आहे. श्रावण महिना सुरू झाला, की देवघराजवळ जिवतीचा कागद चिकटविला जातो. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा किंवा जरा-जिवंतिका पूजन केले जाते. श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत करतात. वरदलक्ष्मी व्रत, पूजाविधी, व्रतकथा, महत्त्व, मान्यता आणि आरती याविषयी जाणून घ्या... (Shravan Varad Laxmi Vrat)
तुम्हांला स्वप्नात महादेव शिवशंकरांचे दर्शन झाले? पाहा, यामागील नेमका अर्थ व मान्यता
दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील गृहिणी वरदलक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात. देशभराच्या विविध भागात हे व्रत विविध नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत नावाने लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. यंदाच्या वर्षी २० ऑगस्ट २०२१ रोजी वरदलक्ष्मीचे व्रत आचरले जाईल. पूर्वी ज्यांनी हे व्रत केले असेल, अशा व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन हे व्रत करावे, असा सल्ला दिला जातो. (Shravan Varad Laxmi Vrat Date)
रुद्राक्षाचे ‘हे’ लाभ तुम्हाला माहितीयेत का? पाहा, धारण करण्याचा योग्य विधी व महात्म्य
वरदलक्ष्मी व्रतपूजन
श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मी देवीची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते. सुरुवातीला घराची साफसफाई करावी. शुचिर्भूत होऊन सौभाग्य अलंकार परिधान करून पूजेची तयारी करावी. वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प करावा. चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. देवीची श्रीसूक्तयुक्त पूजा करावी. देवीला एकवीस अपपूंचा नैवेद्य दाखवावा. पूजेला आलेल्या स्त्रियांना वाण द्यावे. यानंतर वरदलक्ष्मीची कहाणीचे पठण किंवा श्रवण करावे. या दिवशी संपूर्ण दिवस उपास करावा, असे सांगितले जाते. सुवासिनीची खणा-नारळाने ओटी भरावी. (Shravan Varad Laxmi Vrat Puja Vidhi)
कोरोना, महागाई, अर्थव्यवस्था: ‘असे’ असेल देशासाठी आगामी वर्ष; भारताची कुंडली काय सांगते?
वरदलक्ष्मी व्रताचे महत्त्व
वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळण्यासाठी केले जाते. मात्र, सध्याच्या काळात केवळ रोगमुक्तीसाठी असे व्रत आचरले जातेच, असे नाही. मात्र, तरीही पारंपरिक व्रताचरणात खंड पडू नये, यासाठी अनेक स्त्रिया हे व्रत आजही एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक करतात. या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते. देवीला सुंदर साडी नेसवली जाते. अलंकार, दागिने, कमरपट्टा, हार, नथ यांचा शृंगार केला जातो. गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून हे वरदलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते. देवादिकांनी आणि ऋषिमुनिंनी 'श्री वरदलक्ष्मी' म्हणून तिची स्तुती केली आहे. वरदलक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे. वरदलक्ष्मीची मनोभावे भक्ती करणार्यांच्या घरामध्ये धन-धान्य यांची समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनेल, असे श्री वरदलक्ष्मी देवीचे वचन आहे. (Shravan Varad Laxmi Vrat Significance)
कोटा येथे आहे तब्बल ५२५ शिवलिंगांचे शिवालय; त्यांच्या दर्शनाने मिळते १२ ज्योर्तिर्लिंगांचे पुण्य!
वरदलक्ष्मी व्रतकथा
एकदा कैलासावर शिव-पार्वती सारीपाट खेळत होते. त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला असता त्याने भगवान शिवशंकरांच्या बाजूने निर्णय दिला. त्यावेळी रागावलेल्या पार्वतीमातेने त्या गणाला, तू कुष्ठरोगी होशील, असा शाप दिला. परंतु, शिवाने त्याचा निर्णय योग्य होता, हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले. तसेच त्याला उ:शाप देण्यास सांगितले. तेव्हा पार्वती देवीने, एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करीत असतील. त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल, असे सांगितले. त्याप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रताबद्दलची माहिती विचारून हे व्रत केले. परिणामी तो रोगमुक्त झाला, अशी वरदलक्ष्मी व्रत कथा पुराणात आढळून येते. (Shravan Varad Laxmi Vrat Katha)
देव-दानवांनी केलेले समुद्रमंथन भारतात नेमके कुठे झाले? पाहा, मान्यता आणि काही अद्भूत तथ्ये
लक्ष्मीची देवीची आरती (Lakshmi Devi Chi Aarti)
जयदेवी जयदेवी श्रीलक्ष्मीमाते । प्रसन्न होऊनि आतां वर दे आम्हांते।। धृ. ।।
श्रीविष्णुकांते तव विश्वावरि सत्ता । स्थिरचर दौलत देसी लक्ष्मीव्रत करितां ।। १ ।।
जननी तुजऐसी या नाही त्रिभुवनीं । सुरवर वंदिती मस्तक ठेवुनि तव चरणी ।। २ ।।
कृपाप्रसादें तुझिया लाभे सुखशांति । चिंताक्लेशहि जाती नुरते आपत्ती ।। ३ ।।
वैभव ऐश्वर्याचें आणि अपार द्रव्याचें । देसी दान दयाळे सदैव सौख्याचे ।। ४ ।।
यास्तव मिलिंदमाधव आरती ओवाळी । प्रेमें भक्तिभावें लोटांगण घाली ।। ५ ।।
जयदेवी जयदेवी श्रीलक्ष्मीमाते ।।