शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

Shravan 2023: मोबाईल युगात मोबाईलच्या माध्यमातून करा नामजप; श्रावण मासात करा पुण्यसंचय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 10:26 AM

Shravan 2023: 'इच्छा तिथे मार्ग' ही म्हण आपण ऐकलीच असेल, त्याचीच प्रचिती देणारे नामस्मरणाचे अँप; या श्रावण मासात तुम्हीही नक्की वापरून बघा!

>> ज्योत्स्ना गाडगीळ

वेब सिरीज, चित्रपट, टीव्ही मालिका पाहताना मन जेवढं एकाग्र होतं, तेवढं देवाचं नाव घेताना क्षणभरही होत नाही. म्हणून नामदेव महाराज लिहितात, 'मन माझे गुंतले विषय सुख' अर्थात देवाचं नाव घेताना मनात अनेक विषय पिंगा घालत असतात. असं असताना हरिनाम घ्यायचं तरी कसं? तेही आजच्या मोबाईल युगात, जेव्हा आपण एकाच वेळी शेकडो विषय बघत, ऐकत, बोलत असतो. मनाला शंभर पळवाटा आपणच देतो, मग हे मन देवाचिये द्वारी, क्षणभर तरी उभं कसं करायचं? तर विषाने विषाला (इथे विषयाला) मारायचं! जपमाळ घेऊन नामस्मरण करायला वेळ नाही? मग प्ले स्टोअरवर जाऊन चक्क नामजपाचं अँप डाउनलोड करायचं. (Chanting Japa नावाने प्ले स्टोअरवर सर्च केलं तरी अनेक अँप सापडतील, म्हणून इथे कोणतेही स्पेसिफिक नाव दिले नाहीये.) 

मागच्या दशकात नामस्मरणाचे मशीन घराघरातून ऐकू यायचे. मशीन सुरू केले, की त्यावर 'ओम नमः शिवाय', 'गायत्री मंत्र', 'श्रीराम जय राम जय जय राम' असे नाम जप लावण्याची सोय होती. हरिनाम सतत कानावर पडावे, ऐकताना मनातूनही घेतले जावे आणि घरातले वातावरण सकारात्मक व्हावे हा त्या यंत्राचा हेतू होता. आजही अनेक घरात, मंदिरात ते मशीन पहायला, ऐकायला मिळते. पण आपल्याच पायाला भिंगरी लागलेली असेल तर मशीन लावून काही उपयोग नाही. म्हणून सद्यस्थितीत आपल्या तळ हाताला जो मोबाईल चिकटलेला असतो, त्याचाच उपयोग करून हरिनाम घेणे जास्त सोपे आणि सोयीचे ठरेल. 

दिवसभरात बसमध्ये, ट्रेनमध्ये, रांगेमध्ये, किचनमध्ये उभं असताना पाच मिनिटांची सवड नक्कीच मिळते. तेव्हा हे अँप ओपन करून नामस्मरण सुरू करायचं! यावर कोणी म्हणेल, अशा नाम घेण्याला अर्थ नाही, यात मन गुंतणार नाही. अगदी बरोबर आहे, पण किमान जिभेला आणि मनाला नाम घेण्याची सवय तर लागेल. एकदा का ही सवय लागली, की अर्ध्या रात्रीतून जाग आली तरी अंतर्मनात नामस्मरण सुरू राहतं आणि नित्य नामस्मरणाने त्याची प्रचिती येते. पण आधी सवय लावावी लागते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, पेढा कुठल्याही बाजूने खा, तो गोडच लागतो, तशी रामनामाची अवीट गोडी चाखल्यावरच कळते! या श्रावण मासात तुम्हीही हा अनुभव नक्की घेऊन पहा! शुभस्य शीघ्रम्।

फोटो : श्रीरंग भावे 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल