शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
4
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
5
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
6
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
7
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
8
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
9
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
10
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
11
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
12
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
13
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
14
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
15
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
16
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
17
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
18
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
19
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
20
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट

Shravan 2023: रहस्यमय वाटणारे घुबड दिसणे हे तर शुभ लक्षण; वाचा सविस्तर माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 3:51 PM

Shravan 2023: घुबडाचे दर्शन क्वचितच होते, त्यामुळे त्याच्या दिसण्याबद्दल अनेक अपप्रचार कानावर पडतात, त्यासंदर्भात हा खुलासा!

>> समीर सुनिल तुर्की, निसर्ग निरीक्षक, आळंदी 

घुबड हे लक्ष्मी मातेचे वाहन आहे असे आपण म्हणतो. काही जण म्हणतात त्याच्या दर्शनाने शुभ वार्ता कळतात, धनलाभ होतो, तर काही जण म्हणतात त्याचे दिसणे अशुभ लक्षण असते. मात्र या श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन विचार केला असता घुबडाचे अस्तित्व मानवासाठी लाभदायकच ठरते, म्हणून त्याला अशुभ ठरवण्याची चूक करू नये. त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. 

रहस्यमय असलेला हा पक्षी स्वतःच्या गुणांनी मात्र आई महालक्ष्मीचं वाहन अगदीच शोभून दिसतो. क्षणात कधी उडून जाईल कळणारही नाही. जशी लक्ष्मी चंचल, तसे तिचे वाहनही चंचल! ह्यांची ऐकण्याची, पाहण्याची आणि आवाज करण्याची क्षमता आपल्या कल्पनेपेक्षाही कितीतरी जास्त असते.

काही गुण जे आपण शिकले पाहिजेत

●हे कधीही विचलित होत नाही●हे डिवचल्याशिवाय कोणावरही विनाकारण हल्ला करत नाही●हे कोणालाच घाबरत नाही. उलटपक्षी ह्याच्याच हल्ल्यात इतर पक्षी स्वतःची घरटी सोडून घाबरून पळून जातात.. अपवाद फक्त पक्षीराज गरुड.●कोणी जर पाळले तर मालकावरच हल्ला केला आहे असं अपवादात्मक म्हणून सुद्धा उदाहरण सापडत नाही.

>>ज्या प्रमाणे ह्याचं चालणं रुबाबदार आणि शांत त्याचप्रमाणे ह्याचं उडणं सुद्धा अतिशय शांत आणि जबरदस्त असतं.. इतकं की हे उडतांना अजिबातच आवाज करत नाही.

>>ह्याची नजर इतकी तीक्ष्ण आणि भेदक की विचारता सोय नाही.. रात्री पाहण्याची ह्याची विलक्षण क्षमता ही तर ह्याची सर्वात ताकदीची बाजू. 

>>अगदी आरामात कोणत्याही पक्षाच्या घरट्यावर हल्ला करून तिथून आपली शिकार उचलून क्षणार्धात उडून जाणं कोणालाही धस्सं करू शकतं. जर कोणी ह्याला शिकार करतांना पाहिलं असेल किंवा ह्याची शिकार करायची पद्धत माहिती असेल तर मी काय म्हणतोय ते सहज कळेल.

लक्षात ठेवण्यासारखं काही

>>घुबडाचा हल्ला एखाद्या कुत्रं चावल्याएव्हढाच वाईट असू शकतो. कारण तो इतका वेगवान असतो की काय झालंय हे कळायला सुद्धा वेळ लागतो.

>> घुबडाची पिल्लं कधी जमिनीवर दिसली तर त्यांच्या जास्त जवळ जाऊ नका, वरुन कुठून तरी घुबडं लक्ष ठेवून असतात आणि ती त्यांच्या पिल्ल्यांच्या बाबतीत अत्यंत सजग असल्याने भयानक आक्रमक होऊ शकतात.

>>घुबडाच्या हल्ल्यात माणसं मरत नाहीत, त्यामुळे उगाच जास्त घाबरून त्यांच्यावर प्रतिहल्ला करू नका किंवा त्यांना मारून टाकू नका तर फक्त लवकर दुसरीकडे पळून जा. 

>>आणि हो.. ह्याचा आवाज जरी ऐकू आला तरी उगाच अशुभ अशुभ म्हणून घाबरून जाऊ नका. काही अशुभ नसतं. थोडक्यात काय गैरसमजांपोटी घुबडांना घाबरून जाऊ नका, त्यांच्या शिकारी करू नका.

अशातच श्रावण सुरु झाला आहे, त्यामुळे जैवविविधतील या दुर्मिळ घटकाला इजा पोहोचवू नका, उलट त्याच्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करून पुण्यसंग्रह करा. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलNatureनिसर्ग