हिंदू संस्कृती इतकी थोर आहे की यात केवळ देवपूजा किंवा व्यक्तिपूजाच केली जात नाही, तर प्राणी, वनस्पती, वृक्ष, निसर्ग, सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, ग्रंथ यांचीही पूजा केली जाते. थोडक्यात सर्वत्र परमेश्वर बघा, त्याचे अस्तित्व जाणून घ्या, त्या शक्तीसमोर नतमस्तक व्हा आणि त्यांना साक्षीदार ठेवून आपले काम प्रामाणिकपणे करत राहा. परंतु एवढे सांगून सुधारणा करेल तो मनुष्य कुठला! त्याला प्रलोभनांची सवय असल्याने, कोणती गोष्ट केल्याने कोणता लाभ होतो, हे जाणून घेण्यात त्याला रस असतो. असेच बुध पूजन श्रावण मासात सांगितले आहे. बुध हा ग्रह संसार सुख देणारा, बुद्धी देणारा, आर्थिक स्थैर्य देणारा असल्याने त्याचेही पूजन करून तो तुमच्या कुंडलीच्या दृष्टीने अनुकूल करून घ्या असे म्हटले आहे. त्यासाठी श्रावण बुधवारी शिवपूजन करून बुधाची अनुकूलता प्राप्त करता येते असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे.
बुधवारी सकाळी स्नान झाल्यावर देवासमोर उभे राहून शिवपूजा करावी. महादेवाला बेल आणि पांढरे फुल वाहून आपली सुप्त इच्छा देवासमोर प्रगट करावी आणि पुढे दिलेली शिवस्तुती म्हणावी. असे बुध पूजन करावे.
शिव स्तुति मंत्र (Shiv Stuti Ka Path)
पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यम।जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवारिं महादेवमेकं स्मरामि स्मरारिम।1।महेशं सुरेशं सुरारातिनाशं विभुं विश्वनाथं विभूत्यङ्गभूषम्।विरूपाक्षमिन्द्वर्कवह्नित्रिनेत्रं सदानन्दमीडे प्रभुं पञ्चवक्त्रम्।2।गिरीशं गणेशं गले नीलवर्णं गवेन्द्राधिरूढं गुणातीतरूपम्।भवं भास्वरं भस्मना भूषिताङ्गं भवानीकलत्रं भजे पञ्चवक्त्रम्।3।शिवाकान्त शंभो शशाङ्कार्धमौले महेशान शूलिञ्जटाजूटधारिन्।त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप: प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप।4।परात्मानमेकं जगद्बीजमाद्यं निरीहं निराकारमोंकारवेद्यम्।यतो जायते पाल्यते येन विश्वं तमीशं भजे लीयते यत्र विश्वम्।5।न भूमिर्नं चापो न वह्निर्न वायुर्न चाकाशमास्ते न तन्द्रा न निद्रा।न गृष्मो न शीतं न देशो न वेषो न यस्यास्ति मूर्तिस्त्रिमूर्तिं तमीड।6।अजं शाश्वतं कारणं कारणानां शिवं केवलं भासकं भासकानाम्।तुरीयं तम:पारमाद्यन्तहीनं प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनम।7।नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते नमस्ते नमस्ते चिदानन्दमूर्ते।नमस्ते नमस्ते तपोयोगगम्य नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्।8।प्रभो शूलपाणे विभो विश्वनाथ महादेव शंभो महेश त्रिनेत्।शिवाकान्त शान्त स्मरारे पुरारे त्वदन्यो वरेण्यो न मान्यो न गण्य:।9।शंभो महेश करुणामय शूलपाणे गौरीपते पशुपते पशुपाशनाशिन्।काशीपते करुणया जगदेतदेक-स्त्वंहंसि पासि विदधासि महेश्वरोऽसि।10।त्वत्तो जगद्भवति देव भव स्मरारे त्वय्येव तिष्ठति जगन्मृड विश्वनाथ।त्वय्येव गच्छति लयं जगदेतदीश लिङ्गात्मके हर चराचरविश्वरूपिन।11।