शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

Shravan Amavasya 2024: पिठोरी अमावस्येला मातृदिन का म्हणतात? जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 11:26 AM

Shravan Amavasya 2024: आज श्रावण तथा पिठोरी अमावस्या, आजचा दिवस मातृदिन म्हणूनही साजरा केला जातो, त्यामागचे कारण जाणून घेऊ. 

इंग्रजी तारखेनुसार आपल्याला मदर्स डे ( Mothers Day 2024) माहीत असतो, पण आपल्या परंपरेनुसार पिठोरी अमावस्येला ( Pithori Amavasya 2024) मातृदिन साजरा करतात हे अनेकांना माहीतच नसते. त्यासाठीच आजच्या दिवसाचे महत्त्व आणि त्याला मातृदिन म्हणण्यामागचे कारण जाणून घेऊया. 

श्रावण अमावस्येला ( Shravan Amavasya 2024) आपण 'मातृदिन' साजरा करतो. आज २ सप्टेंबर रोजी मातृदिन आहे. काही जणांना पाश्चात्यांच्या 'मदर्स डे' या संकल्पनेवरून  मातृदिन हा सण घेतला आहे असे वाटते. परंतु तसे नसून ही प्रथा अतिप्राचीन आहे. आपल्याकडे जन्मदात्या आई वडिलांना देवापेक्षाही मोठे स्थान दिले गेले आहे. 'मातृदेवो भव', 'पितृदेवो भव' हा संस्कार पूर्वापार चालत आला आहे. अशा आपल्या जन्मदात्रीप्रती कृतज्ञता म्हणून श्रावण अमावस्येला `मातृदिन' साजरा केला जातो. 

आपल्याकडे माता पित्यांची आज्ञा पाळणाऱ्या, त्यांच्यासाठी सर्व सुखांचा प्रसंगी जिवाचा त्याग करणाऱ्या व्यक्तींकडे आदर्श आणि आदरणीय म्हणून पाहिले जाते. सावत्र आई कैकयीची आज्ञा  आणि वडिलांची तिला दिलेल्या वचनांची पूर्ती व्हावी म्हणून प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षांचा वनवान स्वत:हून स्वीकारला होता. अंध माता पित्यांना कावडीत बसवून श्रावणबाळाने तीर्थयात्रा घडवली. भक्त पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत असताना पांडुरंग आले, तरी अर्धवट सेवेतून उठला नाही. तर पांडुरंगाला थोड्यावेळ थांब म्हणवून विनवणी केली. वडिलांच्या सुखासाठी आणि सावत्र आईचा संशय दूर करण्यासाठी देवव्रताने भीष्मप्रतिज्ञा केली. अशी असंख्य उदाहरणे संस्कृतीच्या विशाल पूर्वइतिहासात सापडतात. 

आजच्या काळात आई आणि मुलांचे नाते दुरावत चालले आहे. मदर्स डे उत्साहात साजरा करणारी मुलं आईबरोबर सेल्फी काढून सोशल मिडीयावर झळकतात. तिथल्या कमेंटला रिप्लाय देतात, परंतु आईशी दोन शब्दही बोलत नाहीत, ही घरोघरी असलेल्या आईची व्यथा आहे. ज्यांनी जन्म दिला त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहिले पाहिजे आणि प्रत्येक दिवस हा मातृ पितृ दिन म्हणून साजरा केला पाहिजे, याची जाणीव करून देण्यासाठी हे निमित्त आहे. 

या दिनाचे महत्त्व जाणून घेत आपणही आपल्या आई-वडिलांचा  आदर कायमस्वरूपी ठेवला पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे. त्यांनी आपला सांभाळ केला, तसा आपण त्यांच्या उतारवयात सांभाळ केला पाहिजे. या सर्व जबाबदारींची जाणीव करून घेत मातृदिन साजरा केला पाहिजे. आजच्या दिवशी पिठोरी अमावस्येचे व्रत केले जाते. समस्त माता हे व्रत आपल्या लेकरांना सुदृढ, निरोगी दीर्घायुष्य मिळावे म्हणून करतात. जर आई मुलांसाठी व्रत करू शकते, तर आपणही तिच्याशी चांगले वागून, काळजी घेऊन, प्रेम देऊन मातृदिन साजरा करायला हवा ना...?

फोटो स्रोत : गुगल 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलMothers Dayमदर्स डे