Shravan Vrat 2022 : श्रावणातला प्रत्येक दिवस वेगवेगळ्या व्रतांनी युक्त असतो. या महिन्यात जास्तीत जास्त उपासना हातून घडावी आणि पुण्यसंचय व्हावा असा प्रत्येक व्रतामागचा हेतू असतो. आपल्या उपास्य देवतेची उपासना करता यावी म्हणून प्रत्येक वाराचे जे स्वामी असतील त्यांची उपासना करा असे सुचवले जाते. त्यामुळे भाविकांकडे पुण्य साच्याचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. दत्त गुरुंची उपासना देखील त्यातलाच एक पर्याय!
श्रावणातल्या गुरुवारी गुरुचरित्राचा पाठ करण्याची अनेक कुटुंबात परंपरा आहे. ती श्रद्धेने पाळली जाते. परंतु गुरुचरित्र वाचताना कडक पथ्ये पाळावयाची असल्याने अलीकडच्या काळात अनेकांना इच्छा असूनही गुरुचरित्र पठण करता येत नाही. त्यावर उपाय म्हणून गुरुचरित्रसार या ग्रंथात दत्तउपासनेसाठी काही मंत्र दिले आहेत. श्रावणी गुरुवारपासून या मंत्रांचा नित्यनेमाने जप करावा. मनोभावे केलेल्या या उपासनेचे फळ निश्चित मिळू शकेल.
इष्ट फलप्राप्तीसाठी:'दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा' या मंत्राचा संकल्पपुर्वक १०८ वेळा जप करावा.
विद्याभ्यासात प्रगतीसाठी: 'ऊँ दत्ताय साक्षात्काराय नम:' या मंत्राचा रोज अभ्यासापूर्वी १० वेळा जप करावा.
संकटाचे निवारण होण्यासाठी : अनसूयाऽत्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबर:, स्मर्तृगामी स्वभक्तानामुद्धर्ता भवसंकटात् - या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
दारिद्रयाचे निवारण होऊन सांपत्तिक परिस्थिती सुधारावी म्हणून :दद्रिविप्रगेहे य: शाकंभुक्तवोत्तमश्रियम् , ददौ श्रीदत्तदेव: स, दारिद्रयाच्छ्रीप्रदोऽवतु - या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
सौभाग्यवृद्धीसाठी :जीवायामास भर्तारं, मृतं सत्या हि मृत्युहा, मृत्युंजय: स योगीन्द्र: सौभाग्यं मे प्रयच्छतु - या मंत्राचा विवाहित स्त्रियांनी १०८ वेळा नित्य जप करावा.
संततीप्राप्तीसाठी : दूरीकृत्य पिशाचार्ति जीवयित्वा मृतं सुत् , योऽभूदभीष्टद: सिद्ध: स न: संततिवृद्धिकृत् - हा मंत्र पती व पत्नीने नित्य श्रद्धेने १०८ वेळा जप करावा. दोघांपैकी एकाने हा मंत्र म्हटला आणि दुसऱ्याने श्रवण केला तरी चालेल.