शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
3
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
4
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
5
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
6
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
7
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
8
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
9
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
10
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
11
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
12
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
13
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
14
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
15
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
16
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
17
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
18
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
19
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
20
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा

Shravan Purnima 2024: नारळी पौर्णिमेला रामाचे करतात पूजन; त्यामागे आहे सुंदर रामकथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 7:00 AM

Raksha Bandhan 2024: श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते; या दिवशी सागराची पुजा करताना रामचीही पूजा करतात, कारण...

यंदा १९ ऑगस्ट रोजी म्हणजे येत्या बुधवारी नारळी पौर्णिमा आहे. त्यादिवशी समस्त कोळीबांधव सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करतात आणि पावसामुळे स्थगित झालेला मासेमारीचा व्यवसाय पुन्हा सुरू करतात. लाटांवर स्वार होत ते रामाला साद घालतात, `वल्हव रे नाखवा होऽऽ वल्हव रे रामाऽऽ'

तुम्ही म्हणाल, हे तर लतादीदींनी गायलेले सुप्रसिद्ध गीत आहे. त्याचा आणि रामायणाचा काय संबंध? कोळीबांधव नाव वल्हवत रामा होऽऽऽ म्हणत जी साद घालतात किंवा बंगालमध्ये `ओ माजी रेऽऽऽ' म्हणतात, ती रामायणातल्या रामाला असते का? हे सगळे काही आपण समजून घेऊ. त्यासाठी आपल्याला रामायणात डोकवावे लागेल. 

राजा दशरथाला अर्थात आपल्या वडिलांना दिलेले वचन पाळण्यासाठी रामचंद्र, सीता माई आणि लक्ष्मण सर्व संग परित्याग करून वल्कले नेसून दंडकारण्यात जायला निघाले. सुमंतांनी त्या तिघांना गंगाघाटापर्यंत आणून सोडले. तिथून पुढचा प्रवास त्यांना पायी करायचा होता. परंतु वाटेत विस्तीर्ण गंगा नदी होती. तिचे विशाल पात्र पार करून जायचे, तर नावेची गरज लागणार होती. त्यावेळेस समस्त नावाडी रामसेवेसाठी उपस्थित होते. परंतु रामप्रभुंना कोणाकडूनही सेवा घ्यायची नव्हती. मात्र सूर्यास्त होण्याआधी गंगेचे पात्र ओलांडून पलीकडे जायचे होते. त्यामुळे नाईलाजाने त्यांना नावेची सेवा घ्यावी लागली.

त्यावेळेस नावाड्यांचा प्रमुख गुहक नावाडी रामसेवेसाठी पुढे आला आणि त्याने रामचरणांची पाद्यपूजा करून त्यांना आपल्या नावेत घेतले. नाव वल्हवत दुसऱ्या तीरापर्यंत आणली. परंतु राम उतरायला तयार होईना. फुकट सेवा घ्यायची नाही, असे ठरवले असतानाही सेवा घेतली होती, पण मोबदला काय द्यायचा ही विवंचना रामप्रभूंना त्रस्त करत होती. त्यावेळेस सीतामार्इंनी रामरायाला आपल्या साखरपुड्याच्या अंगठीकडे लक्ष वेधत खुणेनेच विचारले, `ही अंगठी दिली तर चालेल का?'

आपल्यावर आलेला मानहानीचा प्रसंग आपल्या पत्नीने न बोलता सोडवला हे पाहून रामप्रभूंना तिचे कौतुक वाटले. त्यांनी ती मुद्रिका अर्थात अंगठी गुहक नावड्याला देऊ केली, तेव्हा गुहक नावाडी म्हणाला, 

'रामप्रभू, तुम्ही आम्ही एकाच बिरादरीचे! मी गंगेचा नावाडी, तुम्ही भवसागर पार करून नेणारे नावाडी. एकाच व्यवसायातल्या दोन व्यावसायिकांनी परस्परांशी व्यवहार करायचा नसतो. हे नितीला धरून नाही!' हे गुहक नावड्याचे बोलणे नसून हा भक्त भगवंतामधला संवाद होता. लक्ष्मण आणि सीतामाई आश्चर्याने पाहत होते. त्यावेळेस प्रभू रामचंद्र गुहकाला म्हणतात, `अंगठी देऊ नको म्हणतोस, मग मी तुझ्या ऋणातून उतराई होऊ तरी कसा?'

त्यावेळेस गुहक नावड्याने सांगितले, 'प्रभू रामा, तुझी नौका मी एका तीरावरून दुसऱ्या तीराला लावली, तशी आम्हा कोळीबांधवांची जीवननौका तू पैरतीराला लाव! आम्ही समुद्रात स्वत:ला झोकून देतो. ते तुझ्या भरवशावरच. आमच्या प्राणांच्या रक्षणाची ग्वाही दे!'

हे ऐकल्यावर रामचंद्रांनी तथास्तु म्हणत गुहकाला आश्वस्त केले आणि केवळ गुहकाचाच नाही, तर समस्त कोळीबांधवांचा रामरायाने उद्धार केला....म्हणून आजही समुद्रात नाव वल्हवताना कोळीबांधव रामाचा गजर करत स्वत:ला झोकून देतात....वल्हव रे नाखवा होऽऽऽ वल्हव रे रामाऽऽऽ!