शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

Sankashti Chaturthi Vrat August 2021: श्रावण संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ योग आणि चंद्रोदय वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 1:56 PM

shravan sankashti chaturthi august 2021: श्रावण संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण, शुभ योग आणि विविध शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या...

भारतीय संस्कृतीत व्रतोपासना, सण-उत्सव यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मराठी महिन्यात काही ना काही व्रत, सण, उत्सव येत असतात. मात्र, वैज्ञानिक आणि शास्त्रीयदृष्ट्या यांना अनन्य महत्त्व आहे. आताच्या घडीला चातुर्मास सुरू आहे. चातुर्मासातील एक महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण. श्रावणातील संकष्ट चतुर्थी भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाच्या आधीची असल्याने विशेष महत्त्वाची मानली जाते. श्रावण संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण, शुभ योग आणि विविध शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... (Shravan Sankashti Chaturthi 2021 Date)

श्रीकृष्ण जयंती कधी आहे? जन्माष्टमी व्रत, शुभ मुहूर्त, गोकुळाष्टमीचे महात्म्य व मान्यता

श्रावण संकष्ट चतुर्थी: २५ ऑगस्ट २०२१

श्रावण वद्य चतुर्थी प्रारंभ: २४ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ४ वाजून १८ मिनिटे.

श्रावण वद्य चतुर्थी समाप्ती: २५ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ५ वाजून १३ मिनिटे.

बुधवारी मोदकांचा नव्हे तर लाडवांचा नैवेद्य दाखवून पूर्ण करा विनायक संकष्ट चतुर्थी व्रत!

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. असे असले, तरी संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन बुधवार, २५ ऑगस्ट २०२१ रोजी करावे, असे सांगितले जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला विनायक संकष्ट चतुर्थी म्हणतात. त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पाला लाडवांचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते.  (shravan sankashti chaturthi 2021 vrat puja vidhi in marathi)

रुद्राक्षाचे ‘हे’ लाभ तुम्हाला माहितीयेत का? पाहा, धारण करण्याचा योग्य विधी व महात्म्य

असे करावे संकष्ट चतुर्थीचे व्रत 

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. तसेच श्रावणातील संकष्ट चतुर्थी बुधवारी येत आहे. बुधवारी गणपतीची पूजा, उपासना, आराधना करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी श्रावणातील बुधपूजन केले जाते. यामुळे एकूणच बुधवारी आलेली श्रावणातील संकष्ट चतुर्थी महत्त्वाची मानली जात आहे. (shravan sankashti chaturthi 2021 city wise chandrodaya timing)

तुम्हांला स्वप्नात महादेव शिवशंकरांचे दर्शन झाले? पाहा, यामागील नेमका अर्थ व मान्यता

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ९ वाजून ०६ मिनिटे
ठाणेरात्रौ ९ वाजून ०६ मिनिटे
पुणेरात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून ०१ मिनिट
सातारारात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
नाशिकरात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
अहमदनगररात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे
धुळेरात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे
जळगावरात्रौ ०८ वाजून ५५ मिनिट
वर्धारात्रौ ०८ वाजून ४३ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे
बीडरात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे
सांगलीरात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे
सोलापूररात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे
नागपूररात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे
अमरावतीरात्रौ ०८ वाजून ४६ मिनिटे
अकोलारात्रौ ०८ वाजून ४९ मिनिटे
औरंगाबादरात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे
भुसावळरात्रौ ०८ वाजता ५४ मिनिटे
परभणीरात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे
नांदेडरात्रौ ०८ वाजून ४८ मिनिटे
उस्मानाबादरात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे
भंडारारात्रौ ०८ वाजून ३८ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे
बुलढाणारात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजता 
इंदौररात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटे

 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलSankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी