शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

Shravan Shukravar 2022: पहिल्या वहिल्या श्रावण शुक्रवारी जिवतीला दाखवा हयग्रीवाचा नैवेद्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 5:44 PM

Shravan Vrat 2022: जिवंतीसारखेच दक्षिण भारतात वरदलक्ष्मीचे व्रत केले जाते व देवीला आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो, तसा तिथे हयग्रीवाचा नैवेद्य अर्पण करतात. 

२९ जुलै पासून श्रावण मास सुरू होत आहे. यंदा श्रावण मासाची सुरुवात शुक्रवार पासून होत आहे. महाराष्ट्रात संपूर्ण श्रावणमासात आणि विशेषतः श्रावण शुक्रवारी जसे जिवतीपूजन केले जाते, तसे दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील गृहिणी वरदलक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात आपल्याकडे देखील वरद लक्ष्मीची पूजा केली जाते. वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळण्यासाठी केले जाते. मात्र, सध्याच्या काळात केवळ रोगमुक्तीसाठी असे व्रत आचरले जातेच, असे नाही. मात्र, तरीही पारंपरिक व्रताचरणात खंड पडू नये, यासाठी अनेक स्त्रिया हे व्रत आजही एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक करतात.

या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते. देवीला सुंदर साडी नेसवली जाते. अलंकार, दागिने, कमरपट्टा, हार, नथ यांचा शृंगार केला जातो. गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून हे वरदलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते. देवादिकांनी आणि ऋषिमुनिंनी 'श्री वरदलक्ष्मी' म्हणून तिची स्तुती केली आहे. वरदलक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे. वरदलक्ष्मीची मनोभावे भक्ती करणार्‍यांच्या घरामध्ये धन-धान्य यांची समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनेल, असे श्री वरदलक्ष्मी देवीचे वचन आहे. 

या दिवशी देवीची पूजा करून वरद लक्ष्मीची कथा वाचावी आणि देवीला नैवेद्यात पुरणावरणाचा नैवेद्य दाखवावा. आजच्या दिवशी दक्षिणेत हयग्रीवाचा नैवेद्य दाखवतला जातो. हे खास कर्नाटकी पक्वान्न आहे. घोड्याचे मुख असलेले हयग्रीव स्वामी म्हणजे विष्णूचा अवतार मानतात.त्यांचा आवडता नैवेद्य हयग्रीव!

हयग्रीव करण्याची पद्धत - एक वाटी चणाडाळ स्वच्छ धुवून तिप्पट पाणी घालून शिजवून घ्यावी. डाळ शिजायला हवी पण मोडायला नको. जास्तीचे पाणी काढून एक वाटी गूळ घालून पुन्हा गॅसवर ठेवावी. थोडीशी घोटून घ्यावी. वेलचीपूड, खवलेले ओले खोबरे घालावे. तूपात बेदाणे आणि काजू तळून घालावे.या पदार्थाची चव वाढवण्यासाठी आणि दक्षिणेकडील पदार्थाची ओळख मिळण्यासाठी चिमूटभर भीमसेनी कापूर टाकावा आणि एक दणदणीत वाफ काढावी. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलfoodअन्न