शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

श्रावण शुक्रवार: तिन्हीसांजेला म्हणा देवीचे अत्यंत प्रभावी स्तोत्र; पुण्य लाभेल, शुभच होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 3:18 PM

Shravani Shukrawar 2024: श्रावण शुक्रवारी दिवेलागणीच्या वेळेस लक्ष्मी पूजनासह हे अत्यंत प्रभावी मानले गेलेले स्तोत्र आवर्जून म्हणावे किंवा श्रवण करावे, असे सांगितले जाते.

Shravani Shukrawar 2024: चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे. या संपूर्ण महिन्यात व्रत-वैकल्यांची, सण-उत्सवांची रेलचेल असल्याचे पाहायला मिळते. अनेकार्थाने वेगळेपण जपणारी व्रत-वैकल्ये अगदी प्राचीन काळापासून आधुनिक काळातही आपलेपणाने, भक्तिभावाने, उत्साहाने साजरी केली जातात. या व्रतांमागील व्यापक आणि उच्च उद्देश लक्षात घेऊन व्रतांचे आचरण केल्यास व्रत करायचा आनंद आणि उत्साह नक्कीच द्विगुणित होऊ शकेल. 

श्रावणातील प्रत्येक वाराचे महत्त्व आणि महात्म्य वेगळे आहे. यातील श्रावणी शुक्रवार देवीचे पूजन, व्रताचरण, नामस्मरण, उपासना, साधना यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. लक्ष्मी देवीची विशेष कृपा, शुभाशिर्वाद लाभण्यासाठी देवीचे पूजन, नामस्मरण, विशेष व्रताचरण केले जाते. घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी, धन-वैभव प्राप्त व्हावे, कोणत्याही गोष्टींची चणचण भासू नये, यासाठी लक्ष्मीचे आवाहन केले जाते. लक्ष्मी देवीचे व्रत कठीण असते. लक्ष्मी चंचल असल्याचे म्हटल्याचे जाते. त्यामुळे योग्य पद्धतीने व्रताचरण झाले नाही, तर लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

देवीचे अत्यंत प्रभावी मानले गेलेले स्तोत्र

लक्ष्मी देवीचे प्रभावी मानले गेलेले अष्टलक्ष्मी स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते. प्रत्येक व्यक्ती पैसे कमवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेते. या प्रयत्नांना लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाची जोड मिळाली, तर घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. म्हणूनच आपण प्रयत्नांना उपासनेचीही जोड द्यावी, असे शास्त्र सांगते. या स्तोत्राच्या पठणाचा आणखी एक लाभ म्हणजे, आपल्याला जे हवे आहे ते आपल्या पूर्वजांनी प्रासादिक शब्दात वर्णन करून ठेवले आहे. तेच प्रभावी शब्द स्तोत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. लक्ष्मी देवीच्या आवडत्या गोष्टी अर्पण कराव्यात. प्रभावी अष्टलक्ष्मी स्तोत्र सायंकाळी म्हणजेच दिवेलागणीच्या वेळी तिन्हीसांजेला म्हणावे, असे सांगितले जाते. या अष्टलक्ष्मी स्तोत्राचे केवळ पठण लाभदायक मानले गेले आहे. स्तोत्र पठण शक्य नसेल तर, श्रवण करावे. लक्ष्मी देवीला मनापासून नमस्कार करावा, असे सांगितले जाते.

श्री अष्टलक्ष्मी स्त्रोतम्:

आदि लक्ष्मीः

सुमनस वन्दित सुन्दरि माधवि चंद्र सहोदरि हेममये ।मुनिगण वन्दित मोक्षप्रदायिनी मंजुल भाषिणि वेदनुते ।।पङ्कजवासिनि देवसुपूजित सद-गुण वर्षिणि शान्तिनुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि परिपालय माम् ।।

धान्य लक्ष्मी:

अयिकलि कल्मष नाशिनि कामिनि वैदिक रूपिणि वेदमये ।क्षीर समुद्भव मङ्गल रुपिणि मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते ।।मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि देवगणाश्रित पादयुते ।जय जय हे मधुसूदनकामिनि धान्यलक्ष्मि परिपालय माम् ।।

धैर्य लक्ष्मी:

जयवरवर्षिणि वैष्णवि भार्गवि मन्त्र स्वरुपिणि मन्त्रमये ।सुरगण पूजित शीघ्र फलप्रद ज्ञान विकासिनि शास्त्रनुते ।।भवभयहारिणि पापविमोचनि साधु जनाश्रित पादयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि धैर्यलक्ष्मि सदापालय माम् ।।

गज लक्ष्मी:

जय जय दुर्गति नाशिनि कामिनि वैदिक रूपिणि वेदमये ।रधगज तुरगपदाति समावृत परिजन मंडित लोकनुते ।।हरिहर ब्रम्ह सुपूजित सेवित ताप निवारिणि पादयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि गजलक्ष्मि रूपेण पालय माम् ।।

सन्तान लक्ष्मी:

अयि खगवाहिनी मोहिनि चक्रिणि रागविवर्धिनि ज्ञानमये ।गुणगणवारिधि लोकहितैषिणि सप्तस्वर भूषित गाननुते ।।सकल सुरासुर देव मुनीश्वर मानव वन्दित पादयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि सन्तानलक्ष्मि परिपालय माम् ।।

विजय लक्ष्मी: 

जय कमलासनि सद-गति दायिनि ज्ञानविकासिनि गानमये ।अनुदिन मर्चित कुङ्कुम धूसर भूषित वसित वाद्यनुते ।।कनकधरास्तुति वैभव वन्दित शङ्करदेशिक मान्यपदे ।जय जय हे मधुसूदन कामिनि विजयक्ष्मि परिपालय माम्।।

विद्या लक्ष्मी:

प्रणत सुरेश्वरि भारति भार्गवि शोकविनाशिनि रत्नमये ।मणिमय भूषित कर्णविभूषण शान्ति समावृत हास्यमुखे ।।नवनिद्धिदायिनी कलिमलहारिणि कामित फलप्रद हस्तयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि विद्यालक्ष्मि सदा पालय माम् ।।

धन लक्ष्मी:

धिमिधिमि धिन्धिमि धिन्धिमि-दिन्धिमी दुन्धुभि नाद सुपूर्णमये ।घुमघुम घुङ्घुम घुङ्घुम घुङ्घुम शङ्ख निनाद सुवाद्यनुते ।।वेद पुराणेतिहास सुपूजित वैदिक मार्ग प्रदर्शयुते ।जय जय हे कामिनि धनलक्ष्मी रूपेण पालय माम् ।।

अष्टलक्ष्मी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि ।विष्णुवक्षःस्थलारूढे भक्तमोक्षप्रदायिनी ।।शङ्ख चक्र गदाहस्ते विश्वरूपिणिते जयः ।जगन्मात्रे च मोहिन्यै मङ्गलम शुभ मङ्गलम ।।

।। इति श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम सम्पूर्णम ।। 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलchaturmasचातुर्मासPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिक