शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

Shravan Somvar 2021 Vrat : श्रावणी सोमवारचा उपास सोडण्याआधी शंकराची आरती म्हणता? थांबा! आधी 'हे' वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 12:37 PM

Shravan Somvar 2021 Vrat : मनी नाही भाव अन म्हणे मला देव पाव... कसा पावणार तो देव? त्यासाठी त्याला आर्त साद घालायला नको का? त्यासाठीच हा लेखनप्रपंच!

आरती या शब्दाचा अर्थ आहे आर्तता! आपण दर श्रावणी सोमवारी शिवपूजा करून समर्थ रामदास रचित शिवशंकराची आरती म्हणतो. ती आरती आपल्याला तोंडपाठ आहेच, पण तिचा अर्थ समजून घेत मनापासून गायली, तर ती आर्त साद शिवशंकरापर्यंत नक्कीच पोहोचेल. 

समर्थ रामदास स्वामींचे मराठी भाषेवर अतिशय प्रेम. शब्दलालित्य शिकावे तर त्यांच्याकडून. शब्दांमध्ये प्राण फुंकण्याचे कसब, सामर्थ्य त्यांच्याजवळ होते. त्यांच्या स्वभावातला सडेतोडपणा, कणखरपणा त्यांच्या साहित्यातूनही दिसून येतो. काव्यरचना करताना ते विशिष्ट शब्दांची जोड देऊन नादमाधुर्य निर्माण करतात. आता हनुमंताची आरती बघा ना, 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करी डळमळ भुमंडळ सिंधुजळ गगनी' या शब्दांचा नाद डोळ्यासमोर शब्द चित्र उभे करतो. तसेच संबंधित देवतेच्या कर्तृत्त्वाच्या भव्यतेचे दर्शन घडवतो. शिवशंकराच्या आरतीतूनही समुद्रमंथनाच्या वेळी शिवशंकरांनी घेतलेली भूमिका आणि त्यामुळे शंकराचे अधोरेखित झालेले महत्त्व समर्थांनी शब्दबद्ध केले आहे. 

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठकाळ त्रिनेत्री ज्वाळा,लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा।।जय देव जय देव, जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा।।

समुद्रमंथनातून हलाहल निघाले, तेव्हा ब्रह्मांड लवथवले, म्हणजेच हलून गेले. केवळ एक ब्रह्मांड नाही, तर ब्रह्मांडांची शृंखला, माळा हादरून गेल्या. ते हलाहल पिण्याची शिवशंकरांनी तयारी दर्शवली आणि ते प्राशन केल्यामुळे जणू काही त्यांच्या देहातून, डोळ्यातून दाह निघू लागला. तो शांत करण्यासाठी त्यांनी आपल्या जटांमध्ये बाळा म्हणजे गंगा धारण केली तिच्यातून झुळूझुळू निघणाऱ्या पाण्यामुळे शंकरांवर अभिषेक होऊ लागला. अशा कापूराप्रमाणे शुभ्र कांती गौर वर्ण असलेल्या शिवशंकरा तुझी आरती ओवाळतो. 

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा,विभुतीचे उधळण, शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा।।

कर्पुरगौरा शब्दाची समर्थांनी द्विरुक्ती केली आहे. आधीच्या कडव्यात या शब्दाचा संदर्भ गौरवर्ण असून हलाहल प्राशन करून निळा ठिक्कर पडलेला, अशा दृष्टीने आहे, तर या कडव्यात हिमकन्या पार्वतीला शोभून दिसेल, असा त्याचा कर्पुरगौर वर्ण आहे, असे कौतुकाने ते म्हणत आहेत. त्याचे नेत्र मोठे परंतु अर्धोन्मिलित अवस्थेत असल्याने ते अतिशय मादक दिसतात. त्याच मदनाची मोहिनी माता पार्वतीवर पडली आणि तिने त्याला सुमनांच्या माळा अर्पण करून आपलेसे केले. स्मशानात राहणारा हा देव, भस्मविलेपन  त्याचा श्रुंगार करून होतो. विभुती लावून तो आणखीनच गौरवर्णी दिसत असला, तरी हलाहल प्यायल्यामुळे त्याचा गळा शितीकंठ म्हणजे मोराच्या कंठासारखा निळा झाल्याचे स्पष्ट दिसून येते. तरी तो उमेला शोभून दिसतो आणि तिचा सांभाळ करतो.

देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्यामाजि अवचित हलाहल ते उठले,ते त्वा असूरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले।।

समुद्रमंथनातून निघालेल्या चांगल्या आणि उपयोगी वस्तू देव दानवांनी भांडून पदरात पाडून घेतल्या. परंतु हलाहल निघाले, ते प्यायला कोणी पुढे आले नाही. तू मात्र नि:संकोचपणे हलाहल पचवलेस आणि तेव्हापासून नीलकंठ म्हणून ओळखला जाऊ लागलास.

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी,शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुळटिळक रामदासा अंतरी।।

वैरागी वृत्तीचा शिवशंकर व्याघ्रजीन म्हणजे वाघाचे कातडे परिधान करतो. गळ्यात सर्प गुंडाळतो. मदनावर नियंत्रण मिळवतो. तो आपल्या पाच मुखांनी मुनिजनांकडे कृपादृष्टीने पाहतो. सर्व शक्तिमान असूनही शतकोटीचे बीज ज्या रामनामात आहे, ते सातत्याने घेत त्यातच रममाण होतो. अशा शिवशंकरा तुझ्यासमोर आम्ही नतमस्तक होतो. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल