शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

Shravan Somvar 2024: श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस का धुवू नये; त्यामुळे होणारे नुकसान जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 9:17 AM

Shravan Somvar 2024: स्त्रियांनी केस कधी धुवायचे यावर शास्त्राचं बंधन का? हे सगळे नियम स्त्रियांवरच का? मग योग्य दिवस कोणता? यासारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या. 

सोमवार महादेवाचा, हे आपण बालपणापासून शिकत आलो आहोत. महादेवाला प्रिय असलेल्या गोष्टीदेखील सोमवारी आपण अर्पण करतो, पण अप्रिय गोष्टींचे कोणत्या आणि त्या का टाळायला हव्यात, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ!

येत्या ५ ऑगस्ट पासून श्रावण (Shravan 2024) सुरु होत आहे आणि सुरुवातच होतेय श्रावणी सोमवारपासून (Shravan Somvar 2024)! श्रावणातले तसे प्रत्येक दिवस खासच मानले जातात. तरीदेखील श्रावण सोमवारचे महत्त्व अधिकच! अशा वेळी केलेल्या उपासनेचे पूर्ण फळ मिळावे असे वाटत असेल तर स्त्रियांनी पुढील चुका टाळायलाच हव्या.

असे मानले जाते की सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाढतो. तसेच पैशांशी संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती खालावते. म्हणून सोमवारी आणि विशेषतः श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस धुणे टाळले पाहिजे. तसेच गुरुवारी देखील केस धुवू नये. त्यामुळे त्यांना कुंडली दोष निर्माण होऊ शकतो. ज्यांना धाकटा भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस धुवू नये, अन्यथा भाऊ कर्जबाजारी होतो असे म्हणतात. मग राहिला वार मंगळवार, शुक्रवार आणि रविवार. हे तिन्ही वार न्हाण्यासाठी योग्य मानले गेले आहेत. रविवारी सुटीचा दिवस म्हणून निवांत अंघोळ करत केसावरुन अंघोळ केली जाते, तसेच मंगळवार आणि शुक्रवार देवी लक्ष्मीचे वार असल्याने त्यादिवशी केस धुतल्याने, स्वच्छतापूर्वक देवी लक्ष्मीची पूजा केल्यास ती प्रसन्न होते. 

सोमवार, बुधवार गुरुवार या दिवशी उपास, सण, उत्सव आल्यास केस धुणे लाभदायी ठरते का? तर नाही! शास्त्रात हे वार अमान्य ठरवल्यामुळे निमित्त कोणतेही असले तरी ते दिवस निषिद्धच मानले जातात. अपवाद मासिक पाळीची शुद्धी म्हणून चौथा दिवस या वारी आला असता केस धुणे अनिवार्य ठरते. त्यासाठी शास्त्रात मान्यता आहे, पण एरव्ही पाळलेल्या नियमांचा लाभ स्त्रियांना आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबालाच होतो. पण हे सगळे नियम स्त्रियांनाच का? तर... 

नियम, अटी, बंधने आल्यावर स्त्रियांना या गोष्टींचा जाच वाटू लागतो आणि त्या बंडखोरी करण्यास धजावतात. मात्र धर्मशास्त्रात दिलेल्या गोष्टी नक्कीच विचारपूर्वक दिल्या आहेत, यावर विचार केला आणि विश्वास ठेवून पालन केले तर त्याचा लाभ इतरांना नाही तर स्त्रियांनाच होईल हे नक्की. 

स्त्रीला दुहिता म्हटले जाते. दुहिता म्हणजे दोन्ही घरांचे हित पाहणारी! दोन्ही घरं अर्थात सासर आणि माहेर! ती जेवढ्या आपुलकीने घरच्यांसाठी करते तेवढी आपुलकी तिला घरच्यांकडून मिळतेच असे नाही, तरीदेखील ती आत्मीयतेने घर सांधून ठेवते. ती प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचे मतपरिवर्तन करू शकते. अर्थात बदल घडवण्याची क्षमता तिच्यात असते. म्हणून अनेक व्रत, नियम, उपास स्त्रियांना सांगितले आहेत. कारण परिवर्तनाची सुरुवात तिच्यापासून होते. 

केस धुणे हा स्वच्छतेचा एक भाग असला तरी वरचेवर केस धुणे ही अलीकडे फॅशन झाली आहे. सतत मोकळ्या केसात अडकलेले हात संसाराला हातभार कधी लावणार? हा विचार कालबाह्य वाटत असला तरी शास्त्रकर्त्यांनी यातून जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. रवि, मंगळ, शुक्र अशी एक दिवसाआड केस धुण्याची दिलेली मोकळीक स्त्री आरोग्याचा विचार समोर ठेवून केलेली आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे केस मोठे असल्याने त्याची निगा राखण्यासाठी तीन दिवस पुरेसे आहेत. वारंवार केस धुतल्याने केसांचा पोत बिघडतो. केस गळतात, वाढ खुंटते. केसांचा चांगली तेल मालिश मिळावी या दृष्टीनेही या दिवसांची आखणी केली आहे. परंतु मनुष्य स्वभाव पाहता सरळ सांगितलेल्या गोष्टी त्याला पचनी पडत नाहीत. अशा वेळी धर्मशास्त्राचा आधार घेऊन काही गोष्टी सांगितल्या जातात. धर्मशास्त्र म्हटल्यावर कोणी प्रश्न उपस्थित न करता नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. म्हणून काही बाबतीत नियमांच्या चौकटी धर्मशास्त्राने आखून दिल्या आहेत. 

या गोष्टींचा विचार करता, स्त्री आरोग्याचा विचार करता श्रावण सोमवारी नटण्या मुरडण्यात वेळ न दवडता ईश्वर सेवेत तो वेळ व्यतीत करावा हे या नियमाचे सार आहे असे म्हणता येईल. 

टीप : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Health Tipsहेल्थ टिप्स