शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

Shravan Somwar 2022: महादेवाची आरती म्हणताना अष्टसात्त्विक भाव जागृत व्हावेत, यासाठी जाणून घ्या आरतीचा भावार्थ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 7:00 AM

Shravan Somwar 2022 vrat: आरती म्हणजे आर्ततेने मारलेली हाक! आरतीच्या शब्दांमागचा आशय समजून घेतला तर आर्त हाक आपसूक उमटेल, नाही का?

आज यंदाच्या श्रावणातला शेवटचा सोमवार. दिवसभराचा उपास सायंकाळी सोडणार असाल आणि त्याआधी महादेवाची आरती म्हणणार असाल, तर त्या शब्दांमागचा आशय समजून घेतला तर आरती पाठ करावी लागणार नाहीच, शिवाय ती आर्ततेने म्हटली जाईल. 

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या अनेक आरत्यांपैकी एक आरती, शिवशंकराची. आपल्या नेहमीच्या म्हणण्यात असलेली आरती. मराठीत असूनही ती समजून घेण्याचा आपण कधी प्रयत्न केला आहे का? तशी कधी वेळ आली नसेल किंवा गरजही पडली नसेल, असे म्हणूया. परंतु, अर्थ जाणून घेत आरती म्हटली, तर शाब्दिक चूका होणार नाहीच, शिवाय समजून उमजून आर्ततेने घातलेली साद भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचेल. 

समर्थ रामदास स्वामींचे मराठी भाषेवर अतिशय प्रेम. शब्दलालित्य शिकावे तर त्यांच्याकडून. शब्दांमध्ये प्राण फुंकण्याचे कसब, सामथ्र्य त्यांच्याजवळ होते. त्यांच्या स्वभावातला सडेतोडपणा, कणखरपणा त्यांच्या साहित्यातूनही दिसून येतो. काव्यरचना करताना ते विशिष्ट शब्दांची जोड देऊन नादमाधुर्य निर्माण करतात. आता हनुमंताची आरती बघा ना, 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करी डळमळ भुमंडळ सिंधुजळ गगनी' या शब्दांचा नाद डोळ्यासमोर शब्द चित्र उभे करतो. तसेच संबंधित देवतेच्या कर्तृत्त्वाच्या भव्यतेचे दर्शन घडवतो. शिवशंकराच्या आरतीतूनही समुद्रमंथनाच्या वेळी शिवशंकरांनी घेतलेली भूमिका आणि त्यामुळे शंकराचे अधोरेखित झालेले महत्त्व समर्थांनी शब्दबद्ध केले आहे. 

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठकाळ त्रिनेत्री ज्वाळा,लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा।।जय देव जय देव, जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा।।

समुद्रमंथनातून हलाहल निघाले, तेव्हा ब्रह्मांड लवथवले, म्हणजेच हलून गेले. केवळ एक ब्रह्मांड नाही, तर ब्रह्मांडांची शृंखला, माळा हादरून गेल्या. ते हलाहल पिण्याची शिवशंकरांनी तयारी दर्शवली आणि ते प्राशन केल्यामुळे जणू काही त्यांच्या देहातून, डोळ्यातून दाह निघू लागला. तो शांत करण्यासाठी त्यांनी आपल्या जटांमध्ये बाळा म्हणजे गंगा धारण केली तिच्यातून झुळूझुळू निघणाऱ्या पाण्यामुळे शंकरांवर अभिषेक होऊ लागला. अशा कापूराप्रमाणे शुभ्र कांती गौर वर्ण असलेल्या शिवशंकरा तुझी आरती ओवाळतो. 

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा,विभुतीचे उधळण, शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा।।

कर्पुरगौरा शब्दाची समर्थांनी द्विरुक्ती केली आहे. आधीच्या कडव्यात या शब्दाचा संदर्भ गौरवर्ण असून हलाहल प्राशन करून निळा ठिक्कर पडलेला, अशा दृष्टीने आहे, तर या कडव्यात हिमकन्या पार्वतीला शोभून दिसेल, असा त्याचा कर्पुरगौर वर्ण आहे, असे कौतुकाने ते म्हणत आहेत. त्याचे नेत्र मोठे परंतु अर्धोन्मिलित अवस्थेत असल्याने ते अतिशय मादक दिसतात. त्याच मदनाची मोहिनी माता पार्वतीवर पडली आणि तिने त्याला सुमनांच्या माळा अर्पण करून आपलेसे केले. स्मशानात राहणारा हा देव, भस्मविलेपन  त्याचा श्रुंगार करून होतो. विभुती लावून तो आणखीनच गौरवर्णी दिसत असला, तरी हलाहल प्यायल्यामुळे त्याचा गळा शितीकंठ म्हणजे मोराच्या कंठासारखा निळा झाल्याचे स्पष्ट दिसून येते. तरी तो उमेला शोभून दिसतो आणि तिचा सांभाळ करतो.

देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्यामाजि अवचित हलाहल ते उठले,ते त्वा असूरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले।।

समुद्रमंथनातून निघालेल्या चांगल्या आणि उपयोगी वस्तू देव दानवांनी भांडून पदरात पाडून घेतल्या. परंतु हलाहल निघाले, ते प्यायला कोणी पुढे आले नाही. तू मात्र नि:संकोचपणे हलाहल पचवलेस आणि तेव्हापासून नीलकंठ म्हणून ओळखला जाऊ लागलास.

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी,शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुळटिळक रामदासा अंतरी।।

वैरागी वृत्तीचा शिवशंकर व्याघ्रजीन म्हणजे वाघाचे कातडे परिधान करतो. गळ्यात सर्प गुंडाळतो. मदनावर नियंत्रण मिळवतो. तो आपल्या पाच मुखांनी मुनिजनांकडे कृपादृष्टीने पाहतो. सर्व शक्तिमान असूनही शतकोटीचे बीज ज्या रामनामात आहे, ते सातत्याने घेत त्यातच रममाण होतो. अशा शिवशंकरा तुझ्यासमोर आम्ही नतमस्तक होतो. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल