विविध व्रतवैकल्ये सण आणि उत्साहाने भरलेला असा श्रावण मास सुरू झाला आहे. शिवामूठ ,मंगळागौर,रक्षाबंधन ,नारळी पौर्णिमा,श्रीकृष्ण जन्म आणि मातृदिन असे अनेक सण वार या महिन्यात येतील. या महिन्यात शिवपूजेचे महत्त्व ओळखून प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर वाहिली जाणारी शिवामूठ ही खूप महत्त्वाची असेच. त्याचे औचित्य साधून ठाणे येथील घंटाळी मंदिर व्यवस्थापनातर्फे सगळ्यांना अन्नदानाचे आवाहन केले आहे. जीवाचा प्रवास शिवापर्यंत जाणारा असतो, या उपक्रमाच्या माध्यमातून तो नक्कीच साध्य होईल असे म्हणता येईल. त्यानिमित्ताने कोणती शिवामूठ कधी आणि कशी जमा करायची ते जाणून घेऊ.
पहिला सोमवार दिनांक 21Augest शिवामूठ तांदूळ
दुसरा सोमवार दिनांक 28 ऑगस्ट शिवामूठ तीळ
तिसरा सोमवार दिनांक 4 सप्टेंबर शिवामूठ मूग
चौथा सोमवार दिनांक 11 सप्टेंबर शिवामूठ जव/गहू
भाविकांनी दिलेल्या अन्नदानातून विविध सेवाभावी संस्थांना, आश्रमांना तसेच वनवासी पाड्यांवरील बालकांसाठी हे अन्नदान केले जाणार आहे. श्रावणात आपण गहू ,तांदूळ,कडधान्य,साखर, गूळ, तेल तसेच डाळींचे दान करावे. जीव सेवा हीच ईश्वरसेवा. त्यामुळे जास्तीत जास्त अन्नदान करूया असे आवाहन घंटाळी मंदिर व्यवस्थापन समिती तर्फे करण्यात आले आहे.
संपर्क :
डॉ.सौ.अश्विनी बापट. 8355918354
सौ.प्रिया ढवळे9869900589 .या उपक्रमापर्यंत पोहोचणे आपल्याला शक्य नसेल तर या उपक्रमातून प्रेरणा घेत आपणही आपल्या राहत्या परिसरात अशा उपक्रमाचे आयोजन करावे आणि सर्वांना या महादानासाठी उद्युक्त करावे, हीच या सणाची फलश्रुती!