शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

Shravan Vrat 2022: श्रावणमासात 'ही' पाच झाडं लावली असता, मरणोत्तर स्वर्गप्राप्ती होते असे म्हणतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 7:00 AM

Shravan Vrat 2022: मनुष्याला जिवंतपणाची कमी आणि मृत्यूपश्चात आपले काय होईल याची काळजी असते. त्यावर स्कंद पुराणाने दिले आहे पुढील उत्तर. 

श्रावणात सकल सृष्टी हिरवळ पांघरून नव्या नवरीसारखी टवटवीत दिसते. या सृष्टीत आपला खारीचा वाटा म्हणून वृक्षारोपणाचा संकल्प करावा, जेणेकरून आता कमावलेले पुण्य मरणोत्तरही कामी येईल असे स्कंद पुराण सांगते!

'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' असे म्हणत आपल्या संतांनी थेट वृक्ष वेलींशीं सोयरीक जोडली आहे. आपण त्यांचे अभंग म्हणतो परंतु त्यांनी दिलेला संदेश लक्षात घेत नाही. वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन यावर भर देत नाही मग अंगाची काहिली झाली, सावली मिळाली नाही, पाऊस वेळेत पडला नाही की रडत बसतो. म्हणूनच संत वचनाला स्कंद पुराणाची जोड देत वृक्ष लागवडीचे महत्त्व समजून घेऊ. 

सध्या आपण पाहतो, की रस्त्याच्या दुतर्फा परदेशी झाडांनी देशी झाडांची जागा व्यापून टाकली आहे. त्या झाडांचा ना सरणाला उपयोग ना सावलीला. केवळ पाला पाचोळा नि कचरा. त्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी नेहमी आंबा, वड, पिंपळ यांच्या लागवडीवर भर दिला. त्याला अध्यात्मिक तसेच शास्त्रीय आधार सुद्धा आहे. कसा ते जाणून घेऊ...   स्कन्द पुराणात एक अद्भुत श्लोक आहे:

अश्वत्थमेकम् पिचुमन्दमेकम्न्यग्रोधमेकम्  दश चिञ्चिणीकान् ।कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च. पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत्।।

अश्वत्थः = पिपंळ,  पिचुमन्दः = कडूनिंब,  न्यग्रोधः = वट वृक्ष,  चिञ्चिणी = चिंच,  कपित्थः = कवठ,  बिल्वः = बेल, आमलकः = आवळा, आम्रः = आंबा (उप्ति = झाडे  लावणे) 

जो कोणी या झाडांची लागवड करेल ,त्यांची निगा राखेल त्याला नरकाचे दर्शन होत नाही. असा या श्लोकाचा अर्थ आहे. यावरून आपल्याला वरील झाडांचे अध्यात्मिक महत्त्व तर कळलेच. शिवाय त्याचे भौगोलिक महत्त्व देखील समजून घेऊ. 

गुलमोहर, निलगिरी, सुबाभूळ ही झाडे आपल्या देशातील पर्यावरणाला घातक आहेत. तरी पाश्चात्यांचे अंधानुकरण करून अगदी पर्यावरणाच्या बाबतीत देखील ज्या चुका घडल्या त्या वड, पिंपळ,आंबा चिंच आदी झाडे लावून पुढच्या पिढीला निरोगी आणि सुजलां सुफलां पर्यावरण देण्याचा प्रयत्न करू. 

दुष्काळाचे खरे कारण 

पिंपळ, वड आणि लिंब हि झाडे लावणे बंद केल्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. हे वाचुन आपल्याला विचित्र वाटेल, परंतु हे सत्य आहे. पिंपळ कार्बन डाय ऑक्साइड १००% शोषून घेतो, तर वड  ८०% आणि कडुलिंब ७५% शोषतो आणि ही झाडे परिसराला गारवा निर्माण करतात तसेच प्राणवायू देऊन नैसर्गिक ताजेतवाने करण्याचे काम करतात. 

काही वर्षांपूर्वी यूकेलिप्टसची (नीलगिरी) झाडे लावण्यास सुरुवात झाली. यूकेलिप्टस फार पटकन वाढते. दलदलीची जमीन कोरडी करण्यासाठी हे झाड लावले जाते. ज्यामुळे जमीन जलविहीन होते.गेल्या ४० वर्षांपासून हे वृक्ष सर्वमहामार्गांवर दुतर्फा लावले गेली आहेत. त्यामुळे उष्णता वाढून वेगाने पाण्याची वाफ होत आहे. 

पिंपळाला झाडांचा राजा म्हणतात. त्याच्या स्तुती मध्ये एक श्लोक आहे -

मूले ब्रह्मा त्वचा विष्णु शाखा शंकरमेवच!!पत्रे पत्रे सर्वदेवायाम् वृक्ष राज्ञो नमोस्तुते!!

पिंपळाच्या मुळामध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू, शाखांमध्ये महादेव यांचे वास्तव्य असते तर सर्व पानापानांमध्ये अन्य देवतांचे वास्तव्य असते. म्हणून पिंपळाला अध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे. त्याची पूजादेखील केली जाते. विशेषतः हे झाड पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत बीजारोपण होऊन रुजले जाते. पण काही लोक तेही खुडून टाकतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचवतात. त्यांना रोखले पाहिजे आणि पिंपळाची सळसळ, चैतन्य वातावरणात रुजवली पाहिजे. 

आपण जितकी जास्त वड, पिंपळ, आंबा, कडुलिंब यांची झाडे लावू, तेवढा आगामी पिढीला त्याचा फायदा होणार आहे. देश प्रदूषण मुक्त होईल. पुढची पिढी आपले आभार मानेल. श्रावणात पुण्य संचयाच्या हेतूने या वृक्षाची लागवड करा. या पुण्यकर्माने जिवंतपणी तर नाहीच पण मरणोत्तरही नरकाचे तोंड बघावे लागणार नाही अशी स्कंद पुराणाने हमी दिली आहे!

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलNatureनिसर्ग