शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

Swami Samarth: देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे; वाचा, स्वामी समर्थ महाराजांची शिकवण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 9:10 PM

Swami Samarth: स्वामी समर्थांनीही माणसात देव पाहण्याची शिकवण दिली आहे. नेमके काय घडले? वाचा...

माणसाला माणसाप्रमाणे वागवावे. माणसात देव पाहावा, असे नेहमी सांगितले जाते. अनेक जणांचा देव या संकल्पनेवर विश्वास नसतो. मात्र, बहुतांश भारतीय धार्मिक आणि देवावर विश्वास ठेवणारे आहेत. देव जसा सगुण, साकार आहे, तसा तो निर्गुण निराकारही आहे. ज्या माणसाची जशी भक्ती, श्रद्धा असेल, तसा तो त्याला त्या स्वरुपात दिसत असतो. हीच शिकवण स्वामी समर्थांनी एका घटनेतून समाजाच्या पुनःप्रत्ययाला आणून दिली. स्वामी समर्थांनीही माणसात देव पाहण्याची शिकवण दिली आहे. नेमके काय घडले? 

अक्कलकोटला आषाढी एकादशीचा मोठा उत्सव असतो. प्रतिवर्षीप्रमाणे स्वामींनी आपल्या घरी आले पाहिजे, असे चोळप्पाला वाटत असते. केवळ चोळप्पाच नाही, तर अक्कलकोटमधील अन्य तीन स्वामीभक्तांचीही तीच इच्छा असते. तर दुसरीकडे, स्वामींनी गावाच्या उत्सवाला हजर राहिले पाहिजे, असे बाळप्पांना वाटत होते. या मुद्द्यावरून या पाच जणांचा आपापसात वाद होतो. शेवटी यावर तोडगा काढण्यासाठी तिघेही स्वामींकडे येतात.

अंगारकी संकष्टी, आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा; ‘हे’ आहेत जुलै महिन्यातील मुख्य सण-उत्सव

    स्वामी या सर्वांची इच्छा आणि हट्ट ऐकून घेतात. जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हावी, असे वाटत असेल, तर एक परीक्षा द्यावी लागेल. जो या परीक्षेत उतीर्ण होईल त्याच्या घरी आम्ही येऊ. हातात तेलानी गच्च भरलेली पणती घेऊन मनात स्वामींचे नामस्मरण करत एका निश्चित स्थानावरून सर्वांनी स्वामींकडे यायचे. जो प्रथम स्वामींजवळ पोहोचेल, तो जिंकेल आणी स्वामी त्याच्याच घरी येतील, अशी अट स्वामी ठेवतात. हा पण पूर्ण करताना तेलाचा एकही थेंब सांडता कामा नये, असे स्वामी सांगतात.

    बाळाप्पा सर्वप्रथम स्वामींकडे पोहोचतात. ते आनंदी होतात. पण स्वामी महाराज म्हणतात की, अरे पहिला तर आलास. मात्र, मनात नाव कुठे घेतलेस माझे?, अशी विचारणा करून त्याला परीक्षेतून बाद करतात. सर्व जण अनुतीर्ण होतात. सगळे अगदी निराश होतात. मी तुझ्याकडे येणार आहे. मात्र, तू कुणालाही सांगू नको, असे स्वामी सर्वांना रस्त्यात गाठून सांगतात.

    जुलै महिन्यात ‘हे’ ४ ग्रह करणार राशीपरिवर्तन; कसा होणार लाभ? जाणून घ्या

      आषाढी एकादशीचा सोहळा पार पडतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या सर्वांमध्ये वाद होतो. चोळप्पा म्हणतात की, स्वामी त्यांचाकडे आले होते. अन्य तीन भक्तही हेच सांगतात. त्यांच्यात वादही होतात. पुन्हा शेवटी सर्वजण स्वामींकडे येतात. स्वामी म्हणतात की, भगवंतांचे चैतन्यस्वरूप आपण विसरलात की काय, चैतन्याला स्थूल-देहाच्या मर्यादा नसतात. आम्ही तुमच्याच अंतरात वसलेले आहोत. फक्त गरज आहे की, ते शोधून काढायची. जेव्हा तुम्ही तुमच्या अंतरात असलेल्या देवाचा शोध घ्याल, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्हाला स्वत्वाची जाणीव होईल आणि भगवंतांच्या नेमक्या स्वरुपाचे तुम्हाला दर्शन होईल. केवळ तुमच्यातच नाही भगवंत सर्व जीवांत वास करतो. म्हणून उगाच कुणालाही त्रास किंवा मनस्ताप देऊ नये, असा बोध स्वामी देतात.  

      टॅग्स :spiritualअध्यात्मिक