शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
2
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
4
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
5
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
6
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
7
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
8
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
9
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
10
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
11
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश
12
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
13
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
14
'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव
15
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
16
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
17
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
18
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
19
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
20
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

श्रीकृष्ण जन्माष्टमी: श्रीकृष्णाची अद्भूत नीती; ‘हे’ १० निर्णय ठरले महाभारताचे टर्निंग पॉइंट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 11:32 AM

Shri Krishna Janmashtami 2024: महाभारतात श्रीकृष्णाने मुसद्दीपणाने घेतलेले काही निर्णय कलाटणी देणारे ठरले, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

Shri Krishna Janmashtami 2024: २६ ऑगस्ट २०२४ रोजी श्रीकृष्ण जयंती आहे. जन्माष्टमीचा उत्सव देशभरात साजरा केला जातो. श्रीकृष्णाला पूर्णावतार मानले जाते. महाभारतातील श्रीकृष्णाची भूमिका ही अगदी भिन्न होती. महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्णाने धर्माला साथ दिली होती. श्रीकृष्णाने हातात शस्त्र न घेता महाभारत युद्धात पांडवांना विजय मिळून दिला. अर्जुनाची द्विधा मनःस्थिती झाली, तेव्हा श्रीकृष्णांच्या मुखातून कालातीत ज्ञान बाहेर पडले, ते म्हणजे भगवद्गीता. एकूण महाभारत काळात श्रीकृष्ण नीती ही अद्भूत ठरली. आजही अनेक अभ्यासक श्रीकृष्णाच्या नीतीवर अभ्यास, संशोधन करत आहेत. श्रीकृष्णाने मुसद्दीपणाने घेतलेले काही निर्णय कलाटणी देणारे ठरले, असे सांगितले जाते. 

मुत्सद्दीचा मार्ग निवडायला हवा

शत्रू सामर्थ्यवान असल्यास त्याचाशी थेट लढण्याऐवजी मुत्सद्दीने लढायला हवे. भगवान श्रीकृष्णाने कालयवन आणि जरासंधाबरोबर अगदी असेच केले होते. कालयवनाला मुचकुंदाच्या हाती ठार मारले, तर जरासंधाला भीमाच्या हातून ठार मारले. हे दोन्ही योद्धा सामर्थ्यवान होते. परंतु श्रीकृष्णाने या दोघांना युद्धाच्या आधीच संपवले. खरे तर सरळ मार्गावरून सर्व काही मिळवणे सोपे नसते. विरोधी पक्ष वरचढ असतात. अशावेळी मुत्सद्दीचा मार्ग निवडायला हवा, असा वस्तुपाठ श्रीकृष्णाने घालून दिला. आजच्या काळातही तो लागू पडतो, असे आपल्याला पाहायला मिळेल.

साहस, धोरण आणि योग्य वेळी शक्ती-युक्तीचा वापर

युद्धामध्ये साहस, धोरण आणि योग्य वेळी योग्य शस्त्र व योग्य व्यक्तीचा वापर करणे हे महत्त्वाचे आहे. पांडव संख्याबळाने कमी होते. मात्र, ते प्रचंड पराक्रमी होते. श्रीकृष्णाच्या धोरणामुळे ते जिंकले. घटोत्कचाला युद्धामध्ये उतरवले, तेव्हा त्याची गरज होती. कर्णाला आपले अमोघास्त्र चालवावे लागले. अन्यथा तो ते अर्जुनावर चालवणार होता. म्हणून त्याचे बलिदान व्यर्थ ठरले नाही. अर्जुनासह पाच पांडवांनी आपल्याबरोबर युद्ध करीत असलेल्या सर्व योद्ध्यांना वेळोवेळी वाचवले. आपल्या एखाद्या योद्धावर विरोधीपक्षाचे सैन्य किंवा योद्धा वरचढ होत आहे, ते त्याच्या मदतीसाठी त्वरित धाव घ्यायचे.

मिळालेल्या संधीचे सोने अन् अचूक व्यवस्थापन

महाभारत युद्धात कौरवांवर पांडव वरचढ ठरले, यामागे श्रीकृष्णाची मुसद्देगिरी, धोरणीवृत्ती आणि नीती कारणीभूत ठरली, असे सांगितले जाते. युद्धात शत्रूला मारण्याची संधी मिळत असल्यास त्याला त्वरित ठार मारावे. तो वाचल्यास आपल्याला डोकेदुखी किंवा आपल्या पराभवाला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत शत्रू वाचायला नको. श्रीकृष्णाने गुरु द्रोण आणि कर्ण यांच्यासोबत हेच केले होते. युद्धामध्ये मरण पावलेल्या सैनिकांचे अंत्यसंस्कार, जखमींवर उपचार, लक्षावधी सैनिकांच्या जेवणाची व्यवस्था सर्व सैनिकांच्या शस्त्रांचा पुरवठा करण्यासारखे काम व्यवस्थिरित्या पार पाडले. हे सर्व कार्य श्रीकृष्णाच्या देखरेखीखाली आणि अचूक व्यवस्थेमुळे शक्य झाले.

प्रत्येक योजना व्यवस्थित रचली

कोणतेही वचन, करार आणि तडजोड स्थिर नसते. देशाचे, धर्माचे, सत्याचे नुकसान होत असल्यास ते मोडायला हवे, असे म्हटले जाते. श्रीकृष्णाने शस्त्रे न बाळगण्याची आपली घेतलेली शपथ मोडून धर्माचे रक्षण केले होते. अभिमन्यूला भीष्माने बनवलेल्या नियमाबाहेर जाऊन निःशस्त्रच मारले, त्याच क्षणी आता या युद्धात कुठल्याही कायदाचे पालन करावयाचे नाही, असे धोरण श्रीकृष्णाने स्वीकारले. श्रीकृष्णांनी ज्या प्रकारे महाभारत युद्ध हाताळले, त्याचप्रमाणे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्याला सांभाळले. त्यांनी प्रत्येक योजना व्यवस्थित रचली होती, असे सांगितले जाते.

विश्वरुपदर्शन आणि भगवद्गीता

महाभारताच्या भयंकर युद्धात श्रीकृष्णाने गीतेचे ज्ञान दिले. ही घटना सर्वांत आश्चर्यकारक ठरली. एखादी व्यक्ती जीवनाच्या कोणत्याही आघाडीवर युद्ध करत असल्यास त्याला ज्ञान, सत्संग आणि प्रवचन ऐकत राहावे. हे प्रेरणेसाठी गरजेचे आहे. यामुळे त्या व्यक्तीचे लक्ष आपल्या उद्दिष्टाकडे राहते. अर्जुनाच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीकृष्णांनी सविस्तर, विविध दाखले देत दिली. अर्जुनाचे समाधान होईपर्यंत श्रीकृष्णांनी त्यांना समजावले आणि युद्धासाठी तयार केले. विश्वरुप दर्शन घडवले. आपले हेतू चांगले असल्यास ते पूर्ण करण्यासाठी योग्य मार्गाची निवड केली पाहिजे. सत्य आणि न्यायासाठी साधन काहीही असो. साध्य महत्त्वाचे असते, असे श्रीकृष्ण नीतीतून दिसून येते. 

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीMahabharatमहाभारतspiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मासShravan Specialश्रावण स्पेशल