मुंबई - तुम्हाला अनेकदा रस्त्यात पडलेले पैसे सापडले असतील. रस्त्यामध्ये पडलेली ही नाणी आणि नोटा ह्या शुभ-अशुभाचे संकेत देत असतात. या नोटा किंवा नाणी उचलली पाहिजेक किंवा नाही, याबाबतही लोकांमध्ये संभ्रम असतो. अनेकदा लोक असे पैसे उचलतात आणि कुठल्या तरी गरजूला किंवा मंदिरामध्ये दान करतात. आज आपण जाणून घेऊयात रस्त्यात सापडलेले पैसे शुभ अशुभाचे कुठले संकेत देतात त्याबाबत.- रस्त्यावर पडलेले पैसे मिळण्याचा अर्थ धनाची देवता असलेली लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तसेच तिची लवकरच तुमच्यावर कृपा होणार आहे, असा होते. कदाचित लवकरच तुम्हाला कुठून तरी अचानक पैसे मिळतील, असे त्याचे संकेत असू शकताता.- रस्त्यावर पडलेली नोट मिळणे याचा अर्थ तुमची कुठली तरी मोठी अडचण टळून गेली असा होतो. तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात कुठली तरी मोठी खूशखबर मिळणार आहे, असा होतो.- जर तुम्ही कुठले तरी नवे काम सुरू करू इच्छित असाल आणि त्यादरम्यान, तुम्हाला रस्त्यात नाणे पडलेले मिळाले तर त्याचा अर्थ तुम्ही कुठल्याही शंकेशिवाय आपली योजना लागू करू शकता. तुम्हाला यश अवश्य मिळेल. तसेच हा जुना जुन्या आर्थिक संकटातून सुटका मिळाल्याचेही संकेत आहेत. - जर घराबाहेर जाताना तुम्हाला रस्त्यामध्ये नाणे किंवा नोट मिळाली तर त्याचा अर्थ तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यामध्ये तुम्हाला अवश्य यश मिळेल. तर कामावरून घरी जाताना पैसे मिळाले तर त्याचा अर्थ लवकरच तुम्हाला मोठा लाभ मिळण्याचे संकेत आहेत. - जर रस्त्यामध्ये पैशांनी भरलेले पाकीट मिळाले तर तो मोठा फायदा होण्याचा संकेत असतो. कदाचित तुम्हाला लवकरच कुठलीही संपत्ती किंवा वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते.
रस्त्यात पैशांनी भरलेलं पाकिट मिळालं तर ते पाकिट ज्याचं असेल त्या व्यक्तीला शोधून त्याला ते परत करणे योग्य ठरेल. मात्र ती व्यक्ती सापडत नसल्यास अशी रक्कम कुठल्या तरी गरीबाला देणं योग्य ठरेल. मात्र जर रस्त्यात एखादं नाणं किंवा नोट मिळाली तर ती तुम्ही स्वत:कडे ठेवू शकता. पण ही रक्कम खर्च करू नका. तुमच्या पाकिटात हे पैसे असणे लकी चार्मप्रमाणे काम करेल.