शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

शुक्रवारी दुर्गाष्टमी: ५ गोष्टी नक्की करा, ‘या’ स्तोत्र पठणाने शुभ-लाभ, लक्ष्मी कृपा मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 2:53 PM

Durga Ashtami Shukrawar Lakshmi Puja: शुक्रवारी दुर्गाष्टमी असून, काही गोष्टी केल्यास लक्ष्मी देवीचे विशेष शुभाशीर्वाद लाभू शकतात, असे म्हटले जाते.

Durga Ashtami Shukrawar Lakshmi Puja: भारतीय संस्कृती, परंपरा आणि मान्यतांनुसार, आठवड्यातील प्रत्येक वार देवी-देवतांसाठी समर्पित असल्याचे सांगितले जाते. तसेच शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीची उपासना, नामस्मरण, पूजन यांसाठी विशेष मानला जातो. या दिवशी आवर्जून लक्ष्मी देवीशी संबंधित गोष्टी केल्या जातात. १४ जून २०२४ रोजी शुक्रवारी दुर्गाष्टमी आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढल्याचे म्हटले जात आहे. या दिवशी लक्ष्मी देवीशी संबंधित काही गोष्टी केल्यास लाभ, सुख-समृद्धी, धन-धान्यात वृद्धी होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

शुक्रवारी आपापले कुळाचार, कुळधर्म, रिती-परंपरा यांनुसार लक्ष्मी देवीचे पूजन केल्यानंतर लक्ष्मी देवीला सौभाग्याच्या काही गोष्टी अर्पण कराव्यात. लाल फूल अर्पण करावे. शक्य झाल्यास कमळाचे फूल अर्पण करावे. लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा. लक्ष्मी नारायण स्तोत्राचे पठण करावे. कनकधारा स्तोत्र, श्रीसुक्त यांचे पठण करावे. स्तोत्रांचे पठण शक्य नसल्यास मनोभावे श्रवण करावे. तसेच लक्ष्मी देवीच्या मंत्रांचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते. 

तिन्हीसांजेचा काळ दिवेलागणीचा मानला जातो. यावेळी लक्ष्मी घरात येते, अशी लोकमान्यता आहे. त्यामुळे सूर्यास्तावेळी दिवलागणीला लक्ष्मी देवीची उपासना, नामस्मरण, पूजन विशेष लाभदायक तसेच पुण्यफलदायी मानले जाते. तिन्हीसांजेला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा तुळशीपाशी दिवा अवश्य लावावा. यावेळी लक्ष्मी देवीचे मनापासून स्मरण करावे. असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन, तिचे शुभाशीर्वाद मिळू शकतात. तसेच घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाऊ शकते, असे सांगितले जाते. 

घरात सुख-समृद्धी, संपन्नता लाभावी, यासाठी माणूस सतत प्रयत्नशील, कार्यरत, मेहनत, परिश्रम घेत असतो. या प्रयत्नांना लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाची जोड मिळाली, तर घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. म्हणूनच प्रयत्नांना उपासनेचीही जोड द्यावी, असे शास्त्र सांगते. स्तोत्र पठणाचा आणखी एक लाभ म्हणजे, आपल्याला जे हवे आहे ते आपल्या पूर्वजांनी प्रासादिक शब्दात वर्णन करून ठेवले आहे. तेच प्रभावी शब्द स्तोत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. व्यस्त दिनचर्येतून शुक्रवारी हे स्तोत्र आवर्जून म्हणावे, असे म्हटले जाते. शक्यतो हे स्तोत्र सायंकाळी दिवलागणीला म्हणावे, असा सल्ला अनेक जण देतात.

श्री अष्टलक्ष्मी स्त्रोतम:

आदि लक्ष्मी

सुमनस वन्दित सुन्दरि माधवि चंद्र सहोदरि हेममये ।मुनिगण वन्दित मोक्षप्रदायिनी मंजुल भाषिणि वेदनुते ।

पङ्कजवासिनि देवसुपूजित सद-गुण वर्षिणि शान्तिनुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि परिपालय माम् ।

धान्य लक्ष्मी:

अयिकलि कल्मष नाशिनि कामिनि वैदिक रूपिणि वेदमये ।क्षीर समुद्भव मङ्गल रुपिणि मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते ।

मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि देवगणाश्रित पादयुते ।जय जय हे मधुसूदनकामिनि धान्यलक्ष्मि परिपालय माम् ।

धैर्य लक्ष्मी:

जयवरवर्षिणि वैष्णवि भार्गवि मन्त्र स्वरुपिणि मन्त्रमये ।सुरगण पूजित शीघ्र फलप्रद ज्ञान विकासिनि शास्त्रनुते ।भवभयहारिणि पापविमोचनि साधु जनाश्रित पादयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि धैर्यलक्ष्मि सदापालय माम् ।

गज लक्ष्मी:

जय जय दुर्गति नाशिनि कामिनि वैदिक रूपिणि वेदमये ।रधगज तुरगपदाति समावृत परिजन मंडित लोकनुते ।हरिहर ब्रम्ह सुपूजित सेवित ताप निवारिणि पादयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि गजलक्ष्मि रूपेण पालय माम् ।

सन्तान लक्ष्मी:

अयि खगवाहिनी मोहिनि चक्रिणि रागविवर्धिनि ज्ञानमये ।गुणगणवारिधि लोकहितैषिणि सप्तस्वर भूषित गाननुते ।सकल सुरासुर देव मुनीश्वर मानव वन्दित पादयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि सन्तानलक्ष्मि परिपालय माम् ।

विजय लक्ष्मी: 

जय कमलासनि सद-गति दायिनि ज्ञानविकासिनि गानमये ।अनुदिन मर्चित कुङ्कुम धूसर भूषित वसित वाद्यनुते ।कनकधरास्तुति वैभव वन्दित शङ्करदेशिक मान्यपदे ।जय जय हे मधुसूदन कामिनि विजयक्ष्मि परिपालय माम् ।

विद्या लक्ष्मी:

प्रणत सुरेश्वरि भारति भार्गवि शोकविनाशिनि रत्नमये ।मणिमय भूषित कर्णविभूषण शान्ति समावृत हास्यमुखे ।नवनिद्धिदायिनी कलिमलहारिणि कामित फलप्रद हस्तयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि विद्यालक्ष्मि सदा पालय माम् ।

धन लक्ष्मी:

धिमिधिमि धिन्धिमि धिन्धिमि-दिन्धिमी दुन्धुभि नाद सुपूर्णमये ।घुमघुम घुङ्घुम घुङ्घुम घुङ्घुम शङ्ख निनाद सुवाद्यनुते ।वेद पुराणेतिहास सुपूजित वैदिक मार्ग प्रदर्शयुते ।जय जय हे कामिनि धनलक्ष्मी रूपेण पालय माम् ।

अष्टलक्ष्मी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि ।विष्णुवक्षःस्थलारूढे भक्तमोक्षप्रदायिनी ।।शङ्ख चक्र गदाहस्ते विश्वरूपिणिते जयः ।जगन्मात्रे च मोहिन्यै मङ्गलम शुभ मङ्गलम ।

। इति श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम सम्पूर्णम । 

 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिक