लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : धार्मिक आणि निसर्गसंपन्न चांदपूर पर्यटनस्थळावर अलीकडे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मात्र या ठिकाणी जाणारा रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत आहे. त्यामुळे कायम अपघाताची भीती असून वाहन खोल दरीत कोसळण्याची शक्यता आहे. या ठिकाणी सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी होत आहे.तुमसर तालुक्यातील चांदपूर पर्यटनस्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. हनुमान देवस्थानावरही भाविकांची गर्दीच असते. तसेच निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी ग्रीन व्हॅलीकडेही पर्यटकांचा ओढा वाढला आहे. जलाशयापर्यंत जाण्यासाठी पर्यटन पॅकेज अंतर्गत सीमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर आता खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरील लोखंडी सळाखा निघाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे सीमेंट रस्ता तयार करताना खाईच्या बाजूला सुरक्षा भिंत तयार करण्यात आली नाही. त्यामुळे वाहन कोसळण्याची भीती असते. हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी असला तरी येणाऱ्या जाणाºया वाहनांमुळे येथे अपघाताची कायम भीती दिसून येते. यापूर्वी या रस्त्यावर अनेक मोटारसायकलचे अपघात झाले आहेत. सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. या रस्त्यावर वळण असताना सूचना फलक लावण्यात आले नाही. जलाशय परिसरात अतिरिक्त जागा नसल्याने सीमेंट रस्त्यावरच चारचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे अन्य वाहनांना मार्ग काढताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते. प्रत्येक जण येथे वाहन घेऊनच येतो. परंतु येथे कोणत्याही सुविधा नसल्याने पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागतो.या पर्यटनस्थळात विश्रामगृहाचे बांधकाम सुरु आहे. त्यानंतर रिसॉर्टचे बांधकाम सुरु करण्यात येणार आहे. परंतु जलाशय परिसरात बोटींग, हॉटेल व अन्य विकास कामांना सुरुवात करण्यात आले नाही. हे विकास कामे करताना रस्त्याचे रुंदीकरण करण्याची अपेक्षा आहे. पर्यटनातून रोजगार संधी देणाºया या स्थळाकडे रस्त्यामुळे पर्यटक पाठ फिरवत असल्याचे सध्या दिसत आहे.सीमेंट रस्त्याची रुंदी अतिशय कमी आहे. एका वेळेस दोन वाहने जाऊ शकत नाही. एका बाजूला खोल दरी असल्याने अपघाताची भीती आहे. रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे.-हेमराज लांजे, माजी सरपंच, चांदपूर
पर्यटनस्थळाचा रस्ता धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 5:00 AM
तुमसर तालुक्यातील चांदपूर पर्यटनस्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. हनुमान देवस्थानावरही भाविकांची गर्दीच असते. तसेच निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी ग्रीन व्हॅलीकडेही पर्यटकांचा ओढा वाढला आहे. जलाशयापर्यंत जाण्यासाठी पर्यटन पॅकेज अंतर्गत सीमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर आता खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरील लोखंडी सळाखा निघाल्याचे दिसत आहे
ठळक मुद्देचांदपूर ग्रीन व्हॅली : अपघाताची भीती, सुरक्षाभिंतीची केली मागणी