हिंदू धर्मात पूजेच्या वेळी कापूर जाळून आरती करण्याला मोठे महत्त्व आहे. असे मानले जाते की कापूरच्या सुगंधाने देवता प्रसन्न होतात आणि सभोवतालचे वातावरण शुद्ध होते. कापराच्या वापराशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. म्हणून पूजेत कापूर नेहमी वापरतात. त्याचबरोबर वास्तूच्या दृष्टीकोनातूनही कापराचे बरेच फायदे सांगितले जातात.
>>जर तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही घरात दररोज संध्याकाळी कापूर जाळावा. असे केल्याने रोगाचा प्रभाव कमी होतो. वातावरण प्रसन्न होते.
>>अपघात टाळण्यासाठी लोक हनुमानाच फोटो किंवा फेंग शुईच्या वस्तू त्यांच्या कारमध्ये लावतात. त्याचबरोबर कापराच्या वडीचाही वापर करता येईल. रात्री कापूर जाळून तुम्ही हनुमान चालीसा वाचा. वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूरच्या दोन गोळ्या घरात ठेवा आणि ती विरघळली की पुन्हा दोन गोळ्या ठेवा. आपण वेळोवेळी हे करत राहिल्यास हे घरातील वास्तू दोष दूर होतील.
>>लग्न ठरण्यात विलंब होत असल्यास कापराचे ६ तुकडे आणि ३६ लवंगाचे तुकडे घ्या आणि त्यात तांदूळ आणि हळद मिसळा. देवी दुर्गेची आरती करून त्यात या वस्तू अर्पण करा. असे केल्याने लग्न लवकर ठरते असा अनेकांना अनुभव आहे.
ग्रहांच्या शांतीसाठीदेखील आपण कापूर वापरू शकता. तूपात भिजलेला कापूर दररोज सकाळ, संध्याकाळ आणि रात्री जाळावा.
>>कापूरच्या दोन गोळ्या घराच्या टॉयलेट आणि बाथरूममध्ये ठेवल्या पाहिजेत.
>>जर तुम्हाला अवास्तव खर्च करण्याची सवय असेल तर सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही कापूरचा दिवा लावावा आणि संपूर्ण घराभोवती फिरावे, त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करावी. यामुळे तुमची अतिरिक्त खर्चाची सवय कमी होईल.
>>जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही श्री यंत्रासमोर कापूर जाळून पूजा करावी. याद्वारे आपल्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होईल.
>>जर आपल्या घरात प्रगती होत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर प्रत्येक खोलीत दोन कपूर आणि लवंगा चांदीच्या किंवा पितळच्या भांड्यात ठेवा. असे केल्यास घरात नकारात्मकता संपेल. आपल्याकडे चांदीची वाटी नसेल तर आपण स्टीलच्या भांड्यात ठेवू शकता.
>>जर आपल्या घरात वारंवार भांडण होत असतील आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येत नसतील तर आपण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूरची गोळी ठेवावी. यामुळे घराचे वातावरण सकारात्मक होईल.
>>वैवाहिक जीवनात अडचणीअसतील, तर बेडरूम मध्ये कापराच्या दोन गोळ्या ठेवाव्यात. त्याच्या सुगंधाने वातावरण सकारात्मक होईल आणि आपले नातेही मधुर होईल.
>>दररोज सकाळी व संध्याकाळी कापूर शुद्ध तुपात बुडवून ठेवा. मग त्यास घराभोवती फिरवा. असे केल्याने घरात सुख-शांती कायम राहते.
दिसायला छोटीशी गोष्ट पण आहे ना मोठी फायदेशीर?