सन २०२१ मध्ये दोन सूर्यग्रहण होणार असल्याचे सांगितले जात आहे. यापैकी पहिले सूर्यग्रहण १० जून २०२१ रोजी होणार आहे. वास्तविक पाहता सूर्यग्रहण ही पूर्णपणे खगोलीय घटना असली, तरी धार्मिकदृष्ट्या याला अधिक महत्त्व आहे. सूर्यग्रहणावेळी काय करावे आणि काय करू नये, याचे वर्णन आपल्याला धर्मशास्त्रांमध्ये आढळून येते. संपूर्ण भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही. असे असले तरी सूर्यग्रहणाला तब्बल १४८ वर्षांनी मोठे योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. सूर्यग्रहणाला कोणते मंत्र म्हणणे लाभदायक ठरणार असून, कोणत्या गोष्टींचे दान करणे फलदायक मानले जाते? जाणून घेऊया...
चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान येतो. अनुकूल परिस्थितीत चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिन्ही गोलांचे मध्यबिंदू कधीकधी एका रेषेत येतात. अशा वेळी चंद्र आड आल्यामुळे पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य काहीसा किंवा संपूर्ण दिसेनासा होतो. याला सूर्यग्रहण असे म्हणतात. अमावास्या जर राहू किंवा केतू यांच्या सान्निध्यात सूर्य असताना घडली, तरच सूर्यग्रहण घडते. राहू व केतू नेहमी वक्री चलनाने मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण लागत नाही.
यंदाचं पहिलं सूर्यग्रहण १० जूनला; आपण नियम पाळायचे का? वाचा, शास्त्र काय सांगतं
शनी जयंतीला सूर्यग्रहण
वैशाख अमावास्येला शनी जयंती साजरी केली जाते. याच दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे. असा योग तब्बल १४८ वर्षांनी जुळून येईल, असे सांगितले जात आहे. यापूर्वी २६ मे १८७३ रोजी असा योग जुळून आला होता. शनी हा सूर्यपूत्र असला, तरी हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. आताच्या घडीला धनु, मकर आणि कुंभ या राशींची साडेसाती सुरू असून, मिथुन आणि तूळ राशीवर ढिय्या प्रभाव सुरू आहे.
सर्वांत पहिल्यांदा सूर्यग्रहण कधी आणि कसं घडलं? वाचा, रंजक कथा
शनी चालिसा आणि दान
ज्या राशीच्या व्यक्तींची साडसाती सुरू आहे, तसेच ज्या राशीच्या व्यक्तींवर ढिय्या प्रभाव आहे, अशा व्यक्तींनी शनीचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनी चालिसा, शनैश्चर स्तोत्र, शनीमंत्राचे पठण करणे उपयुक्त आणि लाभदायक ठरू शकते. तसेच शनीसंबंधी वस्तूंचे दान करणे शुभफलदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे.
मंगळाचे स्थलांतर बारा राशींसाठी ठरेल लाभदायक की सामान्य ; घेऊया थोडक्यात
सूर्यग्रहणाला ग्रहस्थिती
यंदाच्या वर्षीचे सूर्यग्रहण वैशाख अमावास्येला लागत असून, वैशाख अमावास्येला भावुका अमावास्या असेही म्हटले जाते. हे सूर्यग्रहण वृषभ राशीत आणि मृगशीर्ष नक्षत्रावर लागेल. हे सूर्यग्रहण कंकणाकृती असून, वृषभ, तूळ आणि वृश्चिक या राशींच्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी, असे सांगितले जात आहे. तसेच जन्मकुंडलीतील सूर्य मजबूत करण्यासाठी तसेच शुभफल प्राप्त करण्यासाठी सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्याच्या संबंधित वस्तूंचे दान करणे शुभ ठरू शकते, असे सांगितले जात आहे.
वैशाख अमावस्येला 'पांडवांची अवस' असे का म्हणतात आणि ती कशी साजरी केली जाते, ते जाणून घ्या!
कधी लागणार ग्रहण?
भारतीय पंचांगानुसार, सूर्यग्रहणाचा प्रारंभ दुपारी १ वाजून ४२ मिनिटांनी होणार आहे. ग्रहणाचा मध्य सायंकाळी ०५ वाजून ०३ मिनिटांनी असेल. तर, ग्रहणाचा मोक्ष ६ वाजून ४१ मिनिटांनी होईल. १० जून रोजीचे पहिले सूर्यग्रहण तब्बल ५ तास चालेल, असे सांगितले जात आहे. मात्र, भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नसल्यामुळे वेधादि तसेच अन्य नियम पाळू नयेत, असे सांगितले जात आहे.