शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
2
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
3
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
4
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
5
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
6
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
7
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
8
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
9
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
10
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
11
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खंत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
13
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
14
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
15
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
16
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
17
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
18
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
19
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
20
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 11:18 AM

Solar Eclipse 2024: चंद्र ग्रहण असो नाहीतर सूर्यग्रहण मानवासकट पूर्ण सृष्टीवर त्याचे परिणाम दिसून येतात, अशा वेळी काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या. 

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

पत्रिकेतील समस्या आपल्याला समजते पण ती नक्की कशामुळे निर्माण झाली आहे हे समजणे महत्वाचे आहे. अनेकदा त्याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला खूप मागे जावे लागते . अनेकदा संततीचे प्रश्न घेवून पालक येतात . मुल ऐकत नाही , खूप त्रास देते किंवा विचित्र वागते , अभ्यास करत नाही , घरात वस्तूंची अगदी राग आला की आदळ आपट सुद्धा करते , अश्या मुलांना समजून घेता घेता पालक आजारी पडण्याची वेळ येते पण मुले ऐकत नाहीत . 

अशावेळी मुल जन्माला आले त्याच्या आधी ९ महिने म्हणजे गर्भधारणा झाली त्यावेळी कुठली कुठली ग्रहणे झाली ते बघितले तर आपले उत्तर मिळते . गर्भधारणा झाली त्यावेळी किंवा त्याच्या आसपास चंद्र सूर्य ग्रहणे असतील तर मातेच्या गर्भावर त्याचा परिणाम होतो , म्हणूनच गर्भवती स्त्रियांनी ग्रहण बघू नये , बाहेर जाऊ नये असे शास्त्र सांगते . पण आपण उच्च शिक्षित लोक ह्याच शास्त्राला नाव ठेवतो . विज्ञान कितीही पुढे जाऊदे , शास्त्र त्याच्या जागी आहेच आणि ग्रहांचे आपल्या जीवनावर होणारे परिणाम कुणीही थांबवू शकत नाही ते होतच राहणार . सूर्य उगवायचा तो उगवणारच आहे.  

ग्रहणामुळे होणारे परिणाम : 

ऑक्टोबर च्या २ तारखेला हस्त नक्षत्रात सूर्य ग्रहण (Solar Eclipse 2024) होत आहे . ग्रहण रात्री ९ वाजून १३ मिनिटापासून पहाटे ३ वाजून १७ मिनिटापर्यंत असणार आहे . ही एक खगोलीय घटना आहे . हे ग्रहण भारतात जरी दिसणार नसले तरी त्याचा प्रभाव असणार आहेच .  ग्रहण म्हणजे घेणे .ग्रहण हे अध्यात्मिक दृष्टीने चांगले असते. चंद्राच्या हस्त नक्षत्रात हे ग्रहण होत आहे . ज्यांची बुध किंवा चंद्राची दशा चालू आहे किंवा दशा स्वामी ह्या नक्षत्रात असेल तर त्यांनी अधिक उपासना करावी . चंद्र सूर्याची ताकद ग्रहण काळात कमी होते .  रोजच्या जीवनात कामात अडथळे अचानक निर्माण होतात . राहू हा तामसिक ग्रह असून सत्तेत उलथा पालथ करण्यास सुद्धा अती सामर्थ्यवान आहे.  राहूच्या मनमानी समोर कुणाचेही चालत नाही. कन्या राशीत चंद्र रवी बुध आणि केतू समोर मिनेतील राहू आहे. चंद्र मनाचा तर रवी आत्म्याचा कारक आहे. ह्या दोघांची क्षमता कमी होते ती ग्रहण काळात . सोबत बुद्धीचा कारक बुध आणि केतू जो सगळ्या ग्रहांची ताकद काढून त्यांचा शुष्क करणार आहे . शरीरातील हाडे , दृष्टी आणि पित्ताशय , पचनसंस्था  ह्यावर रवीचा अंमल आहे त्यामुळे ह्यासंबंधी काळजी घेणे आवश्यक आहे. तब्येत सांभाळ आणि आहार विहार सुद्धा सांभाळा. वाचेवर , शब्दांवर नियंत्रण ठेवा. बुध हा संवादाचा कारक आहे म्हणून बोलणे कमी असलेले उत्तम .

ग्रहणकाळातील उपाय :

ह्या काळात नामस्मरण हा एकमेव उपाय आहे . सूर्य आपली उजवी नाडी म्हणजे पिंगला तर चंद्र डावी इडा वर अंमल करतो , अमावास्येला सुषुम्ना चालू असते म्हणून अध्यात्मिकता वाढवा . सूर्य म्हणजेच रवी हा अग्नि तत्वाचा ग्रह आहे. रवी हा राजा आहे आणि त्याला थोडा अहंकार असतोच . त्यालाच आपलयाला जपायचे आहे , अहंकार खिशात ठेवा , वादात पडू नका . नवीन काम सुरु करू नका . ग्रहणात पित्त होते म्हणून गुळ खावा . गुळ गहू  दान करा , कुणाला ? चतुर्थ श्रेणीतील लोकांना करा.  आपला नेहमीचा जप नित्य करत राहा. 

संपर्क : 8104639230

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणAstrologyफलज्योतिष