२०२५ या इंग्रजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण(Solar Eclipse 2025) गुढी पाडव्याच्या (Gudi Padwa 2025) आदल्या दिवशी म्हणजेच २९ मार्च २०२५ रोजी लागणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण मीन राशीत होत आहे. या ग्रहणाचा आगामी हिंदू नववर्षावर कसा परिणाम पडणार आहे ते जाणून घेऊ.
धर्मापासून ते खगोलशास्त्रापर्यंत अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी सूर्यग्रहण लवकरच होणार आहे. २०२५ सालातील पहिले सूर्यग्रहण शनिवार, २९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हे सूर्यग्रहण आणखीनच खास आहे कारण या दिवशी शनि स्थलांतरित होणार आहे. मीन राशीत हे सूर्यग्रहण होत आहे आणि शनिचेही मीन राशीत संक्रमण होत आहे. अशा स्थितीत मीन राशीमध्ये शनि आणि सूर्याची भेट होईल, जी ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून खूप शुभ आहे. विशेष आहे. सूर्यग्रहणाचा बारा राशींवर संमिश्र प्रभाव पडेल.
हे खंडग्रास सूर्यग्रहण आहे. भारतीय वेळेनुसार, सूर्यग्रहण २९ मार्च २०२५ रोजी दुपारी ०२:२१ ते संध्याकाळी ०६:१४ मिनिटांपर्यंत राहील. ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे येथे सुतक कालावधी वैध ठरणार नाही. अन्यथा, सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहण सुरू होण्याच्या १२ तास आधी सुरू होतो.
सूर्यग्रहण कुठे दिसणार?
हे सूर्यग्रहण युरोपातील बहुतांश देश, उत्तर-पश्चिम आफ्रिकन देश, उत्तर अमेरिकेचे पूर्वेकडील प्रदेश, दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, अटलांटिक समुद्र, आर्क्टिक महासागर, उत्तर रशियामध्ये दिसणार आहे. हे ऑस्ट्रिया, सूर्यग्रहण बार्बाडोस, बेल्जियम, उत्तर ब्राझील, बर्म्युडा, फिनलंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, ग्रीनलँड, हॉलंड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, उत्तर रशिया, स्पेन, मोरोक्को, युक्रेन, उत्तर अमेरिका, इंग्लंड इत्यादी पूर्वेकडील प्रदेशात दिसणार आहे.
तरीदेखील ग्रहण काळात पुढील चुका टाळा :
हिंदू धर्मात ग्रहण अत्यंत अशुभ मानले जाते, कारण ग्रहणाच्या वेळी वातावरणात नकारात्मकता वाढते. त्यामुळे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आणि त्याच्या ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पूजा, यज्ञ विधी केले जात नाही. मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात. ग्रहण काळात खाणे आणि पिणे देखील निषिद्ध मानले जाते. कारण यावेळी अन्न आणि पाण्यात अशुद्धता निर्माण होते, ज्यामुळे आरोग्यास हानी पोहोचते. त्यामुळे हा चार तासांचा कालावधी तुम्ही देखील वरील गोष्टी करणे टाळा आणि हिंदू नवीन वर्षाचे उत्साहाने, जल्लोषाने स्वागत करा.