मृत्यू हा बहुतेक लोकांसाठी जीवनाचा सर्वात प्रगल्भ आणि गूढ पैलू आहे कारण लोकांनी कोणत्याही गोष्टी ऐकल्या तरीही त्यांना ते काय आहे हे उमजत नाही. विज्ञान आणि तत्त्वज्ञानही मृत्यू काय आहे हे उलगडू शकले नाहीत. अध्यात्मिक प्रक्रिया ही मृत्यबद्दल नाही - तुम्ही अश्या गोष्टीच्या शोधात असता ज्या मृत्यूहूनही खोल आहे. मृत्यूही सांसारिक गोष्ट आहे, त्याबद्दल प्रगल्भ किंवा गूढ असे काहीही नाही. ही अशी गोष्ट आहे जी लोकांबरोबर कायम घडत आली आहे. मृत्यू प्रगल्भ आणि गूढ वाटतो कारण “शॉर्ट टर्म मेमरी लॉस” (स्मरणशक्तीची कमजोरी). जर तुमची स्मरणशक्ती अशी असेल की दररोज सकाळी उठल्यावर तुम्हाला मागील दिवस आठवत नाही, तुम्हाला आठवत नाही की तुम्ही खरोखर झोपी गेला होता, तुम्हाला फक्त एवढेच माहिती आहे की तुम्ही जागे झाले आहात, मग दररोज , असे वाटेल की तुम्ही एक जादुई दुनियेत आहात आणि हे सर्वात रहस्यमय असेल. काही तासांची झोप ही तुमच्या जीवनातील सर्वात रहस्यमय आणि सखोल पैलू ठरली असती कारण तुम्हाला आठवत नसेल की तुम्ही खरोखर झोपलात आणि मग जागे झालात. मृत्यूचे गूढ आणि प्रगल्भता अशीच आहे.
जेव्हा आपण असं म्हणतो "शिव हा विनाशाक आहे. " आपण असे म्हणत नसतो की तो म्हणजे मृत्यू. त्याला मृत्यू मध्ये काहीही रस नाही. त्याच्यासाठी जन्म घेणे आणि मरण पावणे या फारच सांसारिक गोष्टी आहेत, जीवनाचा फार वरवरचा पैलू. तो त्याच्या अंगावर स्मशानातील राख लावून घेतो याचे एक कारण म्हणजे त्याला दाखवायचे आहे की त्याला मृत्यूचा तिटकारा आहे. तो त्याच्याकडे प्रगल्भ किंवा गूढ म्हणून बघत नाही. अध्यात्मिक साधना ही मृत्यूबद्दल नाही. ही मृत्यूच्या मुळापासून जे की जन्म आहे त्यापासून मुक्त होण्याबद्दल आहे. जन्मापासून मुक्त होणे म्हणजेच नैसर्गिकपणे मृत्यूपासून मुक्त होणे.
जन्म आणि मृत्यू हा केवळ कुंभाराचा व्यवसाय आहे - पृथ्वीचा तुकडा उचलणे, त्याला मानवी स्वरुपात आकार देणे आणि तो चालवणे आणि बोलवणे. काही काळानंतर कठपुतळीत बदलणारा हा कुंभाराचा व्यवसाय हा एक साधा खेळ आहे. प्रेक्षकांच्या दृष्टीकोनातून नाटक जाणून घेणे ही एक गोष्ट असते. स्टेजच्या मागून नाटक जाणून घेणे पूर्णपणे भिन्न आहे. एकदा तुम्ही बॅकस्टेजवरुन नाटक पहायला सुरुवात केली की काही वेळाने तुम्हाला ते नकोसे होते. तुम्ही कदाचित त्यातील यांत्रिकीचा आनंद घ्याल परंतु तुम्हाला त्यातील कथेत काही उत्साह वाटणार नाही. कारण हे सर्व कसे एकत्र केले जाते हे तुम्हाला माहित असते. केवळ ज्यांच्याकडे अल्पकालीन स्मृती आहे - दररोज ते एकाच नाटकात येऊन बसतात परंतु मागील दिवसाची आठवण त्यांनी विसरली आहे - त्यांच्यासाठी ते खूप रोमांचक आणि आव्हानात्मक आहे.
तर अध्यात्मिक प्रक्रिया ही जीवन मरणाबद्दल नाही.शरीर जीवन आणि मृत्यू आहे- अध्यात्मिक प्रक्रिया ही तुमच्याबद्दल आहे, जे की जीवन नाही आणि मृत्यूही नाही.