अध्यात्म आणि मानसिक स्वास्थ्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 6:59 PM
अध्यात्म आणि धर्म या दोन्ही गोष्टी समान नाहीत. तर अध्यात्म आणि धर्म हे दोन्ही संस्कृतीचाच भाग आहेत. मानवापेक्षा श्रेष्ठ ...
अध्यात्म आणि धर्म या दोन्ही गोष्टी समान नाहीत. तर अध्यात्म आणि धर्म हे दोन्ही संस्कृतीचाच भाग आहेत. मानवापेक्षा श्रेष्ठ असा देव, अशी शक्ती किंवा असे ‘कोणीतरी ’ असते. हे आध्यात्मिक माणूस मानतो अथवा नाही मानत. आस्तिक आणि नास्तिक दोघेही आध्यात्मिक असू शकतात. धर्म माणसाला जगण्याचा जगण्याचा मार्ग दाखवतो. पण खूप वेळा धार्मिकता ही रूढी-परंपरा, परमेश्वर स्तुती, पूजा-अर्चा, प्रार्थना यातून व्यक्त होते. याउलट आध्यात्मिकतेला कर्मकाडांचे बंधन नाही. असे असले तरी धार्मिकता, धर्मश्रध्दा आणि आध्यात्मिकता हातात हात घालून चालतात.अध्यात्माकडे ओढा असलेले अनेकदा धार्मिकसुध्दा असतात. धार्मिक गं्रथाचे वाचन, निरूपण करणे, त्यांच्या अर्थाविषयी चर्चा आणि वादविवादांमध्ये सहभाग घेणे, जप, नामस्मरण यातून मन शांत करणे, ध्यानधारणेतून मनशक्ती वाढवणे अशा वेगवेगळ्या पध्दतींनी ‘स्व’चा शोध घेतला जातो. ही सगळी चर्चा करण्याचे कारण असे की, आजच्या संघर्षमय जीवनात, मनशांती मिळवणे अधिकाअधिक गरजेचे वाटू लागले आहे. सभोवताली अनेक भौतिक गोष्टीची प्रलोभने, जीवनात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा, अत्यंत धकाधकीचे आणि असुरक्षीत दैनंदिन जीवन या सगळ्यात जीव मेटाकुटीस येतो. मनात निर्माण होणाºया चिंता, विषाद, एखाद्या आपत्तीनंतर मनावर होणारा आघात या सर्वाचा यशस्वीपणे सामना करताना इतर अनेक गोष्टीप्रमाणे आध्यात्मिक दृष्टीकोनाचा खूप फायदा होतो. आतापर्यतच्या शास्त्रीय संशोधनातून हे लक्षात आले आहे.एखादे संकट आले की, परिस्थितीला दोष देत बसले की मन निराश होते. पण ‘देवाला बहुधा या प्रसंगातून मला काहीतरी शिकवायचे आहे’ किंवा ‘देव जे करतो ते भल्याकरताच’ असे म्हणणाºया व्यक्तीला पटकन निराशा येत नाही. अध्यात्माकडे कल असलेल्या व्यक्तीच्या मेंदूतील मज्जांतंतूंच्या जाळ्यात बदल होतात. अंतस्त्राव करणाºया संस्था आणि प्रतिकारशक्ती यामध्ये अनुकूल बदल घडतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे रोगांपासून, शारीरिक आणि मानसिक संरक्षण होते. वार्धाक्यामध्ये येणाºया विषादाच्या मनोविकाराचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून सामना केला तर उदासपणा कमी होतो. ‘माझ्या कुठल्या तरी चुकीची किंवा पापाची शिक्षा मिळते आहे’ किंवा ‘माझे निरोगी असणे माझ्या हातात नाही. तर काही दृष्ट शक्तीच्या हातात आहे’ असे मानणाºयाला जास्त निराशा वाटते. याउलट आयुष्यात समाधानी असलेला आणि ‘आपल्या जीवनात काही शुध्द हेतू आहे’ असे मानणारा कमी निराश होतो.- सविता तायडेशिक्षिका, बुलडाणा.