निवांत आयुष्य जगता यावे असे प्रत्येकाचे स्वप्नं असते. त्यादृष्टीने शिक्षण, नोकरीची धडपड सुरू असते. चांगले शिक्षण, चांगली नोकरी मिळाली तर जोडीदारही चांगलाच मिळणार असा अलिखित नियमच बनला आहे. या नियमाला मुलीसुद्धा अपवाद नाहीत. मात्र एवढे सगळे कष्ट घेऊनही अनेकांची लग्नं खोळंबली आहेत. याउलट काही जण मात्र कमी वयात, सगळे काही स्थिर स्थावर होऊन सुंदर जोडीदार मिळवून मार्गी लागताना दिसतात तेव्हा इतरांच्या मनात स्वाभाविकच असूया उत्पन्न होते. अर्थात अशा योगायोगालाच आपण भाग्य असे म्हणतो. असे सद्भाग्य आपल्या हाती आहे की नाही, हे तपासून बघायची संधी हस्त शास्त्र देत आहे. त्यानुसार पुढील माहिती तुमच्या उपयोगी पडेल.
शुक्र पर्वतावर माशाचे चिन्ह: हस्तरेषा शास्त्रानुसार ज्या लोकांच्या हातात शुक्र पर्वतावर मत्स्य चिन्ह असते, अशा लोकांना खूप श्रीमंत आणि निष्ठावंत, मैत्रीपूर्ण जीवनसाथी मिळतो. लग्नानंतर अशा लोकांचे नशिबी घडते असे म्हणता येईल. त्यांना अपार संपत्तीसोबतच खूप मान-सन्मान मिळतो. ते आपल्या लाइफ पार्टनरला नेहमी आनंदी ठेवतात.
गुरु पर्वतावर त्रिशूल चिन्ह: जर एखाद्या स्त्रीच्या तळहातावर गुरु पर्वतावर त्रिशूल चिन्ह असेल तर अशा व्यक्तीला अतिशय हुशार आणि सुंदर-चतुर पती प्राप्त होतो. तसेच, तो श्रीमंत असतो आणि त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. तर पुरुषांच्या तळहातावर गुरु पर्वतावर लांबलचक रेषा असल्यास त्यांना आकर्षक आणि श्रीमंत कुटुंबातील पत्नी मिळण्याचे भाग्य लाभते. अशा लोकांना सासरकडून आर्थिक लाभ होतो.
विवाह रेषा सूर्य पर्वतावर असावी : ज्या लोकांची विवाह रेषा सूर्य पर्वताकडे जाते, त्यांचा विवाह श्रीमंत कुटुंबात होतो. त्यांचा जीवनसाथीही आदर करतो आणि त्याला सर्व सुख-सुविधा देतो. अशा लोकांचे जोडीदार खूप काळजी घेणारे असतात.
तळहातावर तराजूची खूण: ज्या स्त्रियांच्या तळहातावर तराजूची खूण असते त्यांचा पती एकतर मोठा व्यापारी असतो किंवा उच्च पदावर असतो. असे म्हणता येईल की तो ज्या क्षेत्रात असेल तिथले उच्च पद भूषवितो आणि आपल्या पत्नीला खूप आनंदी ठेवतो.