या वर्षातील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी शनी अमावस्येच्या दिवशी होत आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजे २९ एप्रिलला शनि गोचर म्हणजेच शनीचे राशी स्थलांतर होऊन तो कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यामुळे हे ग्रहण सर्व राशीच्या लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल.
मेष -सूर्यग्रहणामुळे मेष राशीच्या लोकांना वित्तहानी होऊ शकते. या दिवशी व्यवहार करणे टाळावे. फसगत होऊ शकते. त्यामुळे सावध पवित्रा घ्या.
वृषभ - सूर्यग्रहणाचा वृषभ राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकेल. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाल्यामुळे तणावग्रस्त परिस्थिती उद्भवू शकेल.
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांनी सावधतेने वागावे, अन्यथा नुकसान होऊ शकते. या दिवशी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण शुभ आहे. धनलाभ होईल. विवाह निश्चित होऊ शकतो. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील.
सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण चांगले ठरू शकते. पैसा येईल, परंतु अनावश्यक खर्च आणि गुंतवणूक टाळा.
कन्या - कन्या राशीच्या लोकांना मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार नाही, तरीही संयमाने वागा आणि करिअरमध्ये बदल करणे काही काळ टाळा.
तूळ - तूळ राशीच्या लोकांच्या आरोग्यावर सूर्यग्रहणाचा वाईट परिणाम होऊ शकतो. वादविवादांपासून दूर राहा. वाणीवर संयम ठेवा. शांत राहणे इष्ट!
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांच्या करिअरसाठी ही वेळ थोडी कठीण असेल, पण संयम ठेवा. प्रामाणिकपणे आपले काम करत रहा.
धनु - धनु राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण चांगले राहील. आरोग्य-आर्थिक स्थिती सुधारेल. शत्रूंवर विजय मिळेल.
मकर - मकर राशीच्या लोकांनी वाईट सवयींपासून दूर राहा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकेल. मुलांची काळजी घ्या.
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांनी सावध रहावे. गुंतवणुकीत नुकसान, कौटुंबिक वाद, कामात अपयश हाताला लागू शकते. घाई टाळा.
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण चांगले राहील. धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळेल. मान-सन्मान वाढेल.