शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Surya Grahan 2023: सूर्यग्रहण भारतात दिसत नसले तरी ग्रहणकाळात 'ही' उपासना अवश्य करावी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 7:00 AM

Surya Grahan 2023: १४ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या, शनी अमावस्या आणि भरीत भर म्हणजे सूर्यग्रहण आहे, ते भारतातून दिसणार नसले तरी दिलेली उपासना करा!

'ग्रहण' या शब्दात एवढी नकारात्मकता भरली आहे, की आपण एखादे होणारे काम होत नसले तर `काय ग्रहण लागले आहे', असे म्हणतो. या नकारात्मकतेतून ग्रहणाची तीव्रता लक्षात येते. ग्रहण ही भौगोलिक अवस्था आपल्या मानसिक अवस्थेवर तीव्रतेने परिणाम करते. यासाठीच ग्रहणकाळात देवाचे नाव घ्या असे सांगितले जाते. त्यात शनी अमावस्या असल्यामुळे 'ओम शनैश्चराय नमः' हा मंत्र देखील करता येईल. 

>> १४ ऑक्टोबर २०२३ रोजी वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण आहे. ते भारतातून दिसणार नाही, तरीदेखील ग्रहणकाळाचा प्रभाव मात्र समस्त सजीव सृष्टीवर परिणामकारक ठरतो. म्हणून या कालावधीत ईशचिंतन करा असे पूर्वापार सांगितले जाते. 

>> सूर्य-चंद्र ग्रहणात गायत्री मंत्र करावा. याखेरीज अथर्वशीर्ष, पुरुषसुक्त, श्रीसूक्त, रुद्र, नवग्रहांचे मंत्र तसेच अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करावीत. ग्रहणकाळात शक्यतेवढे नाम:स्मरण करावे.

>> स्त्रियांनी स्तोत्र पठण जसे की, महिम्न, व्यंकटेशस्त्रोत्र, विष्णु सहस्त्रनाम, गणेश-देवी सहस्त्रनाम तसेच नामजप करावा. आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून जप करावा. जसे की, श्रीराम जय राम जय जय राम, नमो भगवते वासुदेवाय. इ. नाम घेत असताना आसन घ्यावे. पलंगावर बसू नये. लोळत पडू नये. आपली नित्यकर्म करत प्रभूचे नाम स्मरावे. 

>> सूर्य हा पृथ्वीवरून दिसणारा एकमेव देव आहे. त्याला राहू व केतूच्या जाचातून मुक्त होईपर्यंत आपण देवाकडे प्रार्थना करावी. एकदा का ग्रहण सुटले, की आपत्ती टळली या विचाराने अन्न, वस्त्र, शिधा गरजूंना दान करावा. 

>> हे नियम आपल्या पूर्वजांनी पूर्वापार पाळले आहेत. आपणही यथाशक्ती सहयोग देऊन ईशकार्यात सहभाग घ्यावा आणि ग्रहणकाळ आपल्या नित्यकर्माबरोबरच परमेश्वर चिंतनात घालवावा.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षsolar eclipseसूर्यग्रहण