शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

Surya Grahan in Diwali: दिवाळीतील राेषणाईला चार चाॅंद, यंदा खंडग्रास सूर्यग्रहण सगळीकडे दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 7:41 AM

solar eclipse in Diwali: दा. कृ. सोमण यांची माहिती; २५ ऑक्टोबरला ग्रहण सर्वत्र दिसणार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : यंदा दिवाळीत मंगळवारी, २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. त्यामुळे दिवाळीत दीपोत्सवाच्या रोषणाईदरम्यान आकाशातही सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पाहायला  मिळणार आहे, अशी माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. छायाचित्रकारांसाठी ही एक पर्वणीच असून, भारतातून वेगवेगळ्या वेळी हे सूर्यग्रहण दिसेल, असेही त्यांनी सांगितले.

आश्विन अमावास्या मंगळवार, २५ ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण असून, ते भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून दिसणार आहे. हे सूर्यग्रहण ग्रहणचक्र (सॅरोस) १२४ क्रमांकाचे आहे. मुंबईतून पाहिल्यास सायंकाळी ४:४९ वाजता सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. ग्रहण मध्य सायंकाळी ५.४३ वाजता होईल. ग्रहण सुटण्याआधीच सायंकाळी ६:०८ वाजता सूर्यास्त होईल. तसेच, ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल, असे सोमण यांनी सांगितले. महाराष्ट्रातील पश्चिमेस सागर किनाऱ्यावरून ते पाहिल्यास ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. 

ही घ्या काळजीसूर्यग्रहण हे साध्या डोळ्यांनी न पाहता चष्म्यातूनच पाहावे किंवा चाळणीतून सूर्याची प्रतिमा कागदावर घेऊन त्यामध्ये पाहावे. या सूर्यग्रहणानंतर १४ दिवसांनी मंगळवार, ८ नोव्हेंबरला होणारे चंद्रग्रहणही भारतातून दिसणार आहे. त्या दिवशी ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार आहे. दिवाळीमध्ये सूर्यग्रहण येत असले, तरी सूर्यग्रहणाच्या दिवशी कोणताही सण येत नाही. यंदा शुक्रवार, २१ ऑक्टोबरला गोवत्स द्वादशी-वसुबारस, शनिवार, २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशी, धन्वंतरी पूजन आहे. सोमवारी २४ ऑक्टोबरला नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान आणि लक्ष्मी-कुबेरपूजन आहे. बुधवारी, २६ ऑक्टोबरला बलिप्रतिपदा, भाऊबीज एकाच दिवशी आहेत.    - दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक

गावाचे नाव    ग्रहण प्रारंभ    सूर्यास्तपुणे    सायंकाळी ४:५१.    सायंकाळी. ६:३१ नाशिक    सायंकाळी ४:४७    सायंकाळी ६:३१नागपूर    सायंकाळी ४:४९    सायंकाळी ६:२९कोल्हापूर    सायंकाळी ४:५७    सायंकाळी ६:३०संभाजीनगर    सायंकाळी ४:४९    सायंकाळी ६:३०सोलापूर    सायंकाळी ४:५६    सायंकाळी ६:३०

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणDiwaliदिवाळी 2021