शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
5
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
6
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
7
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
8
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
9
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
10
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
11
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
12
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
13
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
14
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
15
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
16
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
17
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
18
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
19
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
20
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक

Swami Samarth : स्वामींच्या दर्शनाला जाल तेव्हा त्यांच्यासाठी 'विडा' जरूर करून न्या; होणारे लाभ वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 2:37 PM

Swami Samartha: स्वामींसाठी आपुलकीने दिलेली प्रत्येक गोष्ट ते स्वीकारतात, पण त्यांना विडा प्रिय आहे आणि तो अर्पण केल्याने लाभ होतात असाही भाविकांचा अनुभव आहे!

भक्त आपल्या आवडीच्या गोष्टी भगवंताला अर्पण करतो आणि त्याची भक्ती पाहून भगवंत त्याचा स्वीकारही करतो. त्यानुसार आपण जसा देवाला नैवेद्य अर्पण करतो, तसा देवाला विडाही दिला जातो. रसिक भक्तांनी त्यावरही सुंदर कवने लिहिली आहेत. जसे की, 

विडा घ्या हो स्वामिराया l भक्तवत्सल करुणालया llदेतो हात जोडोनियां ll भावें वंदुनिया पायां ll धृ llज्ञानदृष्टी पुगिफळ ll तुमच्या कृपेचे हे बळ llमूळ आधार सोज्वळ ll पापी पतित ताराया ll १ llभक्तीदळ नागवल्ली ll पाने शुद्धही काढिली llनामबळे निर्मळ केली ll सिद्ध झालो जी अर्पाया ll २ llरंगी रंगला हा कात ll प्रेमभावाच्या सहित llत्याने केले माझे हित ll देह लावियला पायां ll ३ llचुना शांती निर्मळ ll त्वांचि दिले भक्तीबळ llकरुनी मनासी कोमळ ll चरणी घातली ही काया ll ४ llवेलची ज्ञानज्योत ll सर्व भूतांच्या विरहित llठेवुनी तुमच्या पायी हेत ll लागे मनासी वळवाया ll ५ llलवंग जाणां तिखट खरी ll घेउनी बुद्धीच्या चतुरी llक्रोध दवडीयला दूरी ll तूची समर्थ ताराया ll ६ llवैराग्याचे जायफळ ll तुम्ही दिले भावबळ llकरुनी विरक्त निर्मळ ll शिरी ठेवियेली छाया ll ७ llपत्री क्षमेची या परी ll बापा मिळविली बरी llसदा राहोनी अंतरी ll सुखे सुखविते देहा ll ८ llकाय बदामाची मात ll फोडुनि द्वैताचा हा हेत llवाढावया भक्तिपंथ ll सिद्ध केला करुणालया ll ९ llआत्महिताहित कस्तुरी ll घेउनी ज्ञानभक्तीपरी llधन्य हिची थोरी ll भविभवात ताराया ll १० llआनंद म्हणे केशर सत्य ll तुमचे पायी माझा हेत llपूर्ण केले मनोरथ ll कृतीकर्मासी वाराया ll ११ ll

कवनाचे शब्द लक्षात घेतले तर हा केवळ प्रापंचिक विडा नाही तर पारमार्थिक विडा असल्याचे लक्षात येईल. हा विडा अर्पण देवाला करायचा आणि त्यामुळे चढणारा भक्तिरंग भक्ताने अनुभवायचा हा त्यामागचा मूळ भावार्थ! त्यामुळे केवळ स्वामींनाच नाही तर दत्ताला, हनुमंताला, रामरायाला, विठुरायाला, साईनाथाला अशा अनेक देवांना विडा अर्पण केल्याची सुमधुर कवने आपल्याला आढळतील. हा झाला पारमार्थिक उद्धार, आता प्रापंचिक उद्धार कसा होतो तेही जाणून घेऊ!

कोणत्याही पूजेमध्ये विड्याचे पान वापरणे खूप शुभ मानले जाते. हिंदू धर्मात विड्याचे पान अत्यंत पवित्र मानले जाते. असे मानले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी देवतांनी भगवान विष्णूची विड्याच्या पानांनी पूजा केली. तेव्हापासून पूजेत विड्याच्या वापर केला जातो. या पानांमध्ये देवी-देवता वास करतात असे मानले जाते.

ज्योतिषशास्त्रात विड्याच्या पानांशी संबंधित उपाय आणि युक्त्या खूप प्रभावी मानल्या गेल्या आहेत. विड्याची पाने केवळ कामात यश मिळवून देत नाहीत तर आपल्या कामातील अडथळेही दूर होतात. 

इच्छापूर्तीसाठी विड्याच्या पानाचे उपाय

>> इच्छापूर्तीसाठी दर मंगळवारी किंवा शनिवारी स्नान करून मंदिरात जावे. बजरंगबलीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा. 

>> विड्याच्या पानांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. ही पाने नकारात्मक शक्तींना शोषून घेतात. म्हणून वास्तुशास्त्राने घरात नागवेलीच्या पानांचा अर्थात विड्याच्या पानांचा वेल लावावा असे सांगितले आहे. 

>> स्वामी समर्थांना आपण विडा अर्पण करतो तसा दर गुरुवारी दत्त गुरूंना स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा. त्यामुळे प्रापंचिक कलह दूर होऊन कौटुंबिक नाते सुधारते. 

>> व्यवसाय वाढीसाठी किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या सुवासिनीची ओटी भरून, जेवू घालून विडा द्यावा. तिने संतुष्ट होऊन आशीर्वाद दिले असता व्यवसाय वृद्धी होते तसेच लक्ष्मी प्रसन्न होते.