शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

Swami Samartha: 'अशक्य ही शक्य करतील स्वामी' हा विश्वास स्वामींवर ठेवा आणि त्यांनी दिलेला 'हा' मंत्र रोज म्हणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 12:03 PM

Swami Samartha : 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे शब्द जेवढे दिलासा देतात, तेवढाच दिलासा त्यांच्या मंत्रातून मिळतो 

अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. असहाय्य, तेजहीन, दुर्बल झालेल्या समाजाला त्यांनी 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा दिलासा दिला.' खुद्द स्वामी आपली पाठराखण करत आहेत, हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसले, तरी स्वामी कृपेने त्यांचे सान्निध्य भाविकांना पदोपदी जाणवते. स्वामींनी आजवर असंख्य भक्तांना ताठ मानेने जगायला शिकवले आहे. आजही तारक मंत्राच्या रूपाने स्वामींचे प्रासादिक शब्द भक्तांना जगण्याची उर्मी देत आहेत. 

ताणतणाव, नैराश्य यात अडकलेल्या प्रत्येक जीवाला 'तारक मंत्र' तणाव नियंत्रणाचे धडे देतो.  तारक मंत्रातले साधे शब्द प्रचंड दिलासादायक आहेत. रोज सकाळी आणि रात्री झोपताना तारक मंत्र म्हणण्याचा आणि समजून घेण्याचा सराव केला, तर आयुष्यातून ताणतणाव कोसो दूर पळून जाईल. यासाठी तारक मंत्राची आशयासह उजळणी करू. 

नि:शंक हो निर्भय हो मना रे,प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,अशक्य ही शक्य करतील स्वामी

कोणत्याही कामाच्या सुरुवातीलाच मनात शंका कुशंका आणून उपयोग नाही. सुरुवात आत्मविश्वासानेच झाली पाहिजे. त्यासाठी मन निर्भयी असले पाहिजे. भीती कशाची आणि कोणाची व का ठेवायची? कारण खुद्द स्वामीबळ आपल्या पाठीशी आहे. म्हणून हे मना सगळे तर्क कुतर्क बाजूला सारून कामाच्या ठिकाणी एकाग्र हो. आपण प्रयत्न करायचे, बाकी फळ काय द्यायचे हे स्वामी बघून घेतील. 

जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.आज्ञेविन काळ ना नेई त्यालापरलोकीही ना भिती तयाला

स्वामी कथेतला एक प्रसंग. यमराज एका व्यक्तीला न्यायला आले. ती व्यक्ती स्वामीभक्त होती. तिने स्वामींना आणखी काही काळ सेवा करण्याची इच्छा प्रगट केली. स्वामींनी यमराजाला त्याला नेऊ नकोस सांगून परतावून लावले. एवढे सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. आपला काळ कधी यायचा, हे स्वामी ठरवतील. आपण आपल्या कामात स्वतःला झोकून द्यायचे. म्हणजे जिवंतपणीच काय तर मरणोत्तर प्रवासही सहज पार पडेल. 

उगाची भितोसी भय हे पळु दे.जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.

कोणी आपल्या सोबत नाही असे म्हणत घाबरण्याचे काहीच कारण नाही. स्वामी आपल्या हृदयात स्थित असून आपल्या प्रत्येक कार्याकडे पाहत आहेत. ते सोबत असताना आपण एकटे कधीच पडणार नाही. म्हणून स्वामींना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्याचा आनंद घ्यायचा. जन्म मृत्यू खेळ आहे. या प्रवासात जेवढे आयुष्य वाट्याला आले, मनसोक्त जगून घ्यायचे. आई बाळाला सांभाळते, तशी आपली काळजी घ्यायला स्वामी 'समर्थ' आहेत. 

खरा होई जागा श्रद्धेसहीत,कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.कितीदा दिला बोल त्यांनीच हात,नको डगमगु स्वामी देतील साथ

माझी नुसती श्रद्धा आहे असे म्हणून चालणार नाही. तर स्वामींवर विश्वास टाकता आला पाहिजे. आयुष्यात कितीही चढ उताराचे प्रसंग आले, तरी स्वामींवरील श्रद्धा डळमळीत होता कामा नये. ते प्रत्येक प्रसंगातून आपल्याला सावरणार आहेत, हा विश्वास त्यांच्याप्रती ठेवायला हवा. ते आजवर जसे मदतीला धावून आले तसे पुढेही येतील. पण त्यासाठी आपल्याला त्यांच्या कृपेस पात्र होता आले पाहिजे. 

विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थस्वामीच ह्या पंचप्राणामृतात,हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती

स्वामींची भक्ती करायची आहे ना, मग प्रामाणिकपणे आपले विहितकर्म पूर्ण करा. कारण काम हाच ईश्वर आहे. काम सोडून, जबाबदारी झटकून स्वामीभक्ती करणे स्वामींनाही आवडणार नाही. ते सर्वत्र व्यापून आहेत. हर तऱ्हेने केलेली सेवा स्वामी चरणी रुजू होते. त्या सेवेची स्वामी नोंद ठेवतात आणि आपल्या सहाय्याला धावून येत तणावमुक्त करतात.