साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन६ ते १२ ऑक्टोबर===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा आठवडा तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. नवीन भौतिक आनंद, सुख सोयी अनुभवता येतील. अडकलेले काम सुटेल. कौटुंबिक सुख समृद्धी राहील. एकूण परिस्थिती सुधारेल. तब्येत चांगली होईल. घर, गाडी, नोकरी, व्यवसाय, जमिनीचे काम यासंदर्भात प्रगती होईल. हा नवरात्रीचा काळ तुम्हाला पराकोटीचे समाधान देऊन जाणार आहे!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही सावकाश आणि चिकाटीने काम करण्याची गरज आहे. भौतिक, आर्थिक, व्यावहारिक गोष्टींकडे जास्त लक्ष द्या. त्यामध्ये नवीन सुरुवात करू शकता. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन योजना मांडा. नवीन सुरुवात करायची असेल तर करा. या दसऱ्याला जुने झटकून नव्या उमेदीने सीमोल्लंघन करा!
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी भावनांचे प्राधान्य घेऊन येत आहे. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, महत्वाचे संवाद घडतील. घरात किंवा नोकरीमध्ये लोकांचा प्रभाव राहील. प्रेमळ, आदराने वागवणारे, समजून घेणारे लोक भेटतील. तुमच्या कलेला वाव मिळेल. काही प्रमाणात राजकारण घडू शकतं. कामामध्ये एक प्रकारचा टप्पा गाठला जाईल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमचं वागणं बोलणं चांगलं आणि सुसंस्कृत ठेवण्याची गरज आहे. ऐकावं जनाचं करावं मनाचं, याप्रमाणे वागा. मोठ्यांसमोर नमतं घ्या. कोणालाही हिणवू नका. कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. तुमच्या जवळच्या व्यक्तींची चांगली काळजी घ्या. भावनिक गुंतागुंत मागे टाकून या दसऱ्याला सीमोल्लंघन करा!
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी संसाधनांकची मुबलकता घेऊन येत आहे. तुम्ही वस्तू, पैसे, लोक, कौशल्य यांनी युक्त असाल. कामामध्ये लोकांकडून चांगला अभिप्राय मिळू शकतो. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाल. घराबाबत किंवा जमिनीबाबत चांगली घटना घडेल. या नवरात्रीत तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहील!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजन नीट करा. कुठे आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर करू शकता. लोकांना मदत करा. सगळ्यांचा सांभाळ करा. व्यावहारिक वागा, पण तुटक वागू नका. वागण्या बोलण्यात धैर्य आणि संयम ठेवा. या दसऱ्याला स्वार्थावर विजय मिळवा!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.