>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२४ ते ३० मार्च===============
नंबर १:
काय घडू शकते? हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण तुमच्या समोर अशी परिस्थिती येईल जिथे तुमच्या धैर्याचा आणि संयमाचा कस लागेल. तुम्हाला हव्या तशा वेगाने गोष्टी घडणार नाहीत. जे मिळायला हवे, त्यात काहीतरी कमी राहू शकते. तुम्हाला मध्यस्ती करावी लागू शकते. गरजेपुरते काम भागेल. मध्यम फलदायी असा हा सप्ताह राहील.
तुम्ही काय करावे? या आठवड्यात तुम्ही धैर्य ठेवा, संयम ठेवा, मन शांत ठेवा. इतरांची समजूत काढा. सगळयांना एकत्र घेऊन पुढे चाला. तुम्ही स्वतः कोणताही पक्ष किंवा कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नका. भांडणात मध्यम मार्ग निवडा. संथ गतीने वाटचाल करा, घाई गडबड करू नका. सगळ्या पसाऱ्यातून चांगलं काय ते निवडा. ध्यान करा, मेडिटेशन करा.
नंबर २:
काय घडू शकते? हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक, आर्थिक समाधानाचा असणार आहे. जे पाहिजे ते मिळण्याची खूप शक्यता आहे. एखादं लहान ध्येय पूर्ण होईल. आर्थिक धनलाभ सुद्धा होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. कुटुंबामध्ये काही कारणाने आनंद राहील, एकोपा राहील. सगळे जण मिळून कुठल्यातरी आनंदात सहभागी होतील.
तुम्ही काय करावे? या आठवड्यात तुम्ही तुमच्या ध्येयावर पूर्ण मेहनत करण्याची गरज आहे. शेवटचा टप्पा आला आहे, हा पार करताच यश येणार आहे म्हणून चिकाटीने पुढे चाला. कामाच्या ठिकाणी किंवा घरी, इतरांशी नीट वागा. मिळून मिसळून रहा, मदत करा आणि घ्या. एखादा गरजेचा खर्च करुन हवं असलेलं काहीतरी घेऊ शकता.
नंबर ३:
काय घडू शकते? हा सप्ताह तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येत आहे. नवीन संधी उपलब्ध होण्याची चांगली शक्यता आहे. कामामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती होईल. संथ पण आश्वासक अशी वाटचाल होईल. आर्थिक दृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक आहे. समाधानकारक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात,आरोग्यात,कामात स्थैर्य लाभेल.
तुम्ही काय करावे? या आठवड्यात तुम्ही काहीतरी नवीन शिकण्यासाठी तयार रहा. येणाऱ्या संधीचे सोने करुन घ्या. मुंगी होऊन साखर खाऊन घ्या. आर्थिक गुंतवणूक विश्वासार्ह ठिकाणी करु शकता. पाय जमिनीवर ठेवा. इतरांना सन्मान द्या, स्वतः थोडा कमीपणा घेतला तर चांगले होईल. काळजी सोडून लहान गोष्टींमध्ये आनंद माना.
श्रीस्वामी समर्थ.