शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

Tarot Card: अतिविचार टाळा, दिवाळी आनंदात घालवा; जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 12:37 PM

Tarot Card: टॅरो कार्डनुसार तीनपैकी एक कार्ड निवडा आणि त्यात दिलेले उपाय करून दिवाळीचा आनंद लुटा! 

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१२  ते १८ नोव्हेंबर===============

नंबर 1:

हा सप्ताह तुमच्यासाठी एकाच वेळी अनेक गोष्टी घेऊन येणार आहे. वेळ कमी आणि काम जास्त अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. निरनिराळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष आणि मन ओढलं जाईल. थोडक्यात मल्टी टास्किंग करावं लागेल. पण यांपैकी कोणतीही गोष्ट हवी तशी पुढे सरकणार नाही, कारण तुमचं लक्ष पूर्ण केंद्रित नसेल. बरेच पर्याय समोर येतील, त्यामुळे एकूण थोडी तारांबळ उडण्याची शक्यता आहे.

या आठवड्यात तुम्ही तुमचं चित्त विचलित न होऊ देण्याचा प्रयत्न करायचा आहे. बऱ्याच गोष्टींमधून एक दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, आणि त्यामध्ये पुढे वाढण्याचा प्रयत्न करा. तुमचं लहान ध्येय निश्चित करा आणि तेवढंच मिळवण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाचे निर्णय घेण्याचं टाळा, किंवा घ्यावा लागलाच तर भावनिक दृष्ट्या घेऊ नका. वरवर आकर्षक वाटणाऱ्या कुठल्याही गोष्टीला भुलू नका.

नंबर 2:

हा सप्ताह तुमच्यासाठी संसाधनांच प्राधान्य घेऊन येत आहे. तुम्ही वस्तू, पैसे, लोक, कौशल्य यांनी युक्त असाल. तुम्हाला तुमच्याकडील वस्तुंचा उपयोग करून प्रश्न सोडवावा लागेल. कामामध्ये लोकांकडून चांगला अभिप्राय मिळू शकतो. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाल. घराबाबत किंवा जमिनीबाबत, तुम्हाला चांगलं वाटेल अशी काही घटना घडेल.

या आठवड्यात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे. सगळ्या वस्तू त्यांच्या क्षमतेप्रमाणे वापरा. आर्थिक नियोजन नीट करा. कुठे आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर करू शकता. लोकांना मदत करा, विशेष करून आर्थिक किंवा भौतिक मदत करा. सगळ्यांचा सांभाळ करा. भावनिक न होता, व्यावहारिक वागा, पण तुटक वागू नका. वागण्या बोलण्यात धैर्य आणि संयम ठेवा. जमिनीवर रहा.

नंबर 3:

हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन संकल्पना किंवा नवीन विचारांना चांगल्या प्रकारे गती देण्याचा असणार आहे. नवीन काहीतरी सुरू करण्यासाठी अनुकूलता मिळेल, प्रोत्साहन मिळेल. दोन किंवा जास्त गोष्टी हाताशी असतील. तुम्हाला ऊर्जा, सामर्थ्य आणि आत्मविश्वास मिळेल. ध्येय साधनात नियोजन जास्त होईल, पण वास्तवात निश्चित प्रगती होईलंच असं नाही. प्रवास संभवतो.

या आठवड्यात तुम्हाला काहीतरी नवीन सुरू करायचं असेल तर नक्की करा, त्यामध्ये चांगली गती मिळेल. अतिविचार करण्यामध्ये वेळ घालवू नका. तुम्हाला आतून योग्य वाटत असलेला, तुम्हाला इच्छा होत असलेला निर्णय घ्या आणि त्यावर ठाम राहून वाटचाल करा. कामामध्ये, घरामध्ये ऊर्जेने काम करा, उत्साह ठेवा. जे ठरवाल ते कृतीत आणा. तुम्हाला लोकांचा पाठिंबा आहे याची जाणीव ठेवा.

श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023Astrologyफलज्योतिष