>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन८ ते १४ सप्टेंबर===============
नंबर १: काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक आणि आर्थिक जडणघडणीचा असणार आहे. इतरांच्या मदतीने निश्चितच एक टप्पा गाठला जाईल. सक्षम आणि स्थिर वाटेल. प्रयत्नांना यश येईल. तुम्ही केलेल्या कामाला ओळख मिळेल. घर, जमीन, गाडी, नोकरी, व्यवसाय किंवा इतर व्यावहारिक गोष्टींमध्ये चांगली प्रगती होईल, संपन्नता राहील.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामात संपूर्ण लक्ष देऊन, जीव ओतून आणि भरपूर कष्ट करून पुढे वाढण्याची गरज आहे. कामामध्ये परिपूर्णता आणायचा प्रयत्न करा. इतरांच्या मदतीने, सोबतीने पुढे चाला. कोणीतरी दिलेल्या सूचना अंमलात आणा. इतरांना तुम्ही देखील मदत करा. एकट्या पेक्षा मिळून मिसळून काम करा. "एकीचे बळ" लक्षात ठेवा!
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी एक अवघड वळण घेऊन येत आहे. एखादे ध्येय हुकले जाऊ शकते. तुम्ही करत असलेले कष्ट या काळात कमी प्रमाणात फलित होईल म्हणून जास्त अपेक्षा न ठेवलेल्या चांगल्या. वास्तविक परिस्थिती पेक्षा तुमची मानसिक स्थिती कशी आहे यावर तुमचा हा काळ अवलंबून राहील. म्हणून "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण!" हे लक्षात ठेवा!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या मनाला येईल तसे वागायला जाऊ नका कारण त्यात तुमची चुकण्याची शक्यता जास्त आहे. कोणत्याही प्रसंगात कोणाचा तरी आधार घेऊन, सल्ला घेऊन पुढे चाला. तुमच्याकडे काय नाही यापेक्षा तुमच्याकडे काही उत्तम आहे, काय चांगले आहे याकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यावर काम करा, यश नक्कीच येईल!
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी भावभावनांचं प्राधान्य घेऊन येत आहे. तुम्ही मुख्यत्वे आनंदी राहणार आहात. तुम्हाला तुमच्या मनाचा कौल घेऊन, बुध्दी आणि इतर व्यवहारिक गोष्टींपेक्षा मन काय सांगत आहे त्याप्रमाणे वागून चांगला अनुभव येईल. कठीण परिस्थितीसुद्धा सकारात्मकतेने हाताळू शकाल. स्वतःमध्ये समाधानी रहाल. कला क्षेत्रात चांगली प्रगती होईल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही भावनांमध्ये वाहवत जात नाही आहात ना, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोणामध्येही भावनिक दृष्ट्या अडकू नका. तुम्हाला आवडणारा एखादा छंद किंवा एखादी कला आत्मसात करा, त्यात वेळ घालवा. इतरांना पूर्ण मदत करा. तुमच्या बोलण्याने इतरांना आधार मिळू शकतो त्याप्रमाणे वागा. कृतज्ञ रहा.
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.