>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन24 ते 30 सप्टेंबर===============
नंबर 1:
हा सप्ताह तुमच्यासाठी तडजोडी करण्याचा आहे. अपेक्षित यश मिळवणे कठीण आहे. इच्छित काहीतरी साध्य करण्यासाठी हा काळ तेवढा योग्य नाही. हव्या असलेल्या गोष्टी पटकन मिळणार नाहीत, त्यासाठी बरेच कष्ट करावे लागतील. कसलीतरी कमतरता जाणवेल. लोकांवर अवलंबून राहावं लागेल. भौतिक सुख सोयी जितक्या हव्याशा वाटतील तितक्याच त्या दुरावत जाऊ शकतात. सगळं असूनंही कुठल्यातरी चिंतेत अस्वस्थ रहाल. इतरांकडून हीन वागणूक मिळू शकते.
या आठवड्यात तुम्ही स्वतःला संयमित ठेवण्याची गरज आहे. गरजा कमी करा, सारखं हे हवं ते हवं असं वागू नका. खूप विचार करून मगंच खर्च करा. सध्या मोठी गुंतवणूक किंवा महत्त्वाचे पैशाचे व्यवहार टाळा. तुमच्याकडे काय नाही यापेक्षा आहे त्यात तुम्ही तुमचं उत्तम कसं करू शकता याकडे लक्ष द्या. भौतिक विषयांमध्ये खूप अडकून राहू नका, त्यातून निराशा संभवते. त्यापेक्षा ध्यान, उपासना, परोपकार हे जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. गरिबांना मदत करा. आरोग्य सांभाळा.
नंबर 2:
हा सप्ताह तुमच्यासाठी कष्ट करण्याचा आहे. कुठलीतरी आवडीची घटना घडायला किंवा केलेल्या प्रयत्नांना यश मिळायला वेळ लागेल. वाट पहावी लागेल. गोष्टी पटापट पुढे सरकणार नाहीत. संयम आणि धैर्याचा कस लागेल. कामांमध्ये विलंब होईल. मध्येच अडकल्यासारखं वाटेल. संसाधने मुबलक असतील पण तरीही काहीतरी कमतरता जाणवेल. थांबून रहावं लागेल, इतरांवर अवलंबून राहावं लागेल. त्यामुळे मनात खिन्नता येऊ शकते. सगळं असून देखील आनंद कमी वाटू शकतो.
या आठवड्यात तुम्ही घाई गडबड न करता शांतपणे परिस्थितीचा सामना करण्याची गरज आहे. सावकाश पुढे चाला. आहे तिथेच राहिलात तरी चालेल पण तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका. खूप कष्ट करा, खूप मनापासून प्रयत्न करा. पण केलेल्या कष्टाचं फळ लगेच मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका, फळ मिळायला उशीर होईल. फळ मिळेल हे निश्चित पण विलंब होईल. हलगर्जीपणा टाळा. संयम ठेवा. गुंतवणूक विचारपूर्वक खात्रीशीर ठिकाणी करू शकता.
नंबर 3:
हा सप्ताह तुमच्यासाठी बुद्धीचे प्राधान्य घेऊन येत आहे. अशा घटना घडतील ज्यात तुम्हाला तुमच्या मनापेक्षा बुद्धीचा वापर करावा लागेल. बुद्धीचातुर्य दाखवावं लागेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, महत्वाचे संवाद घडतील. घरात किंवा नोकरीमध्ये लोकांचा प्रभाव राहील, दबदबा राहील. रुक्ष आणि रोखठोक वागणाऱ्या लोकांशी जुळवुन घ्यावं लागेल. वरिष्ठ लोकांच्या प्रश्नांना सामोरे जावं लागेल. काही प्रमाणात वाद संभवतात. कामामध्ये एक टप्पा गाठला जाईल.
या आठवड्यात तुम्हाला तुमचं बोलणं, एकदम स्पष्ट ठेवण्याची गरज आहे. मुळमुळीत उत्तर न देता, जे बोलाल ते आत्मविश्वासाने बोला आणि तसं वागा. अगदी सचोटीने वागा, खरे बोला. संशयाला, खोट्याला अजिबात जागा ठेवू नका. तुमच्या हाताखाली असलेल्यांना प्रामाणिक मार्गदर्शन करा. मोठ्यांसमोर नमतं घ्या. पक्षपात करू नका, भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. नीट सारासार विचार करून, कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या.
श्रीस्वामी समर्थ.