शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

Tarot Card: खर्चावर नियंत्रण ठेवा नाहीतर पैशाला पाय फुटतील; वाचा येत्या सप्ताहचे टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 2:32 PM

Tarot card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे आगामी साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता. 

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२१ ते २७ जुलै===============

नंबर १:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक सुख समृद्धी घेऊन येत आहे. तुम्हाला एखादे लहान ध्येय गाठता येईल. एखादी हवी असलेली वस्तू घेता येईल. आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी व्यवसायात एक महत्त्वाचा टप्पा येईल. अस्थिर परिस्थिती सुधारेल. एकंदरीत हा काळ अगदी पूर्ण नाही पण काही प्रमाणात यश देणार आहे! 

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुमच्या आर्थिक सक्षमतेने इतरांना मदत कशी करता येईल याचा विचार करा. संकुचित वृत्ती सोडा. मन मोठे करा. सगळ्यांना सामावून घ्या. तुमच्या वर्चस्वाचा गैरवापर करू नका. "न अहंकारात परो रिपु:" म्हणजे अहंकारासारखा दुसरा शत्रू नाही हे लक्षात ठेवा!

नंबर २:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी कष्ट करण्याचा आहे. कुठलीतरी आवडीची घटना घडायला किंवा केलेल्या प्रयत्नांना यश मिळायला वेळ लागेल. वाट पहावी लागेल. संयम आणि धैर्याचा कस लागेल. काहीतरी कमतरता जाणवेल. थांबून रहावं लागेल, इतरांवर अवलंबून राहावं लागेल. पण संयमाचे फळ शेवटी गोड मिळेल याची खात्री ठेवा.

तुम्ही काय करावे?

या आठवड्यात तुम्ही घाई गडबड न करता शांतपणे परिस्थितीचा सामना करण्याची गरज आहे. सावकाश पुढे चाला. आहे तिथेच राहिलात तरी चालेल पण तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका. खूप कष्ट करा. फळ मिळेल हे निश्चित पण विलंब होईल. आर्थिक गुंतवणूक खात्रीशीर ठिकाणी करू शकता.

नंबर ३:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी तुमच्या बुध्दीने काम करण्याचे प्रसंग घेऊन येत आहे. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. घरात किंवा नोकरीमध्ये लोकांचा प्रभाव राहील, दबदबा राहील. रुक्ष आणि रोखठोक वागणाऱ्या लोकांशी जुळवुन घ्यावं लागेल. कामामध्ये संकल्पना आखल्या जातील, नियोजन चांगले होईल. सक्षमतेने पुढे वाढाल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला तुमचे बोलणे स्पष्ट ठेवण्याची गरज आहे. संशयाला, खोट्याला अजिबात जागा ठेवू नका. तुमच्या हाताखाली असलेल्यांना प्रामाणिक मार्गदर्शन करा. नीट सारासार विचार करून, कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" हे सिद्ध करुन दाखवा.

संपर्क : ९५६१०९३७४०

श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष