>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी तुमच्या हिंमतीचा कस लावणारा असणार आहे. जे काही करत आहात त्यात तुमच्या धडाडीची आणि स्वबळाची परीक्षा होऊ शकते. शेवटच्या टप्प्याजवळ काहीतरी अडथळा येऊ शकतो. थोडा विरोध होऊ शकतो. पण त्यावर मात करण्याची तुमच्याकडे ताकत असेल. म्हणून खचू नका, प्रयत्नांती परमेश्वर ही उक्ती लक्षात ठेवा!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज आहे. जिद्दीने आणि चिकाटीने पुढे चाला. विचारपूर्वक काम करा. कुठल्याही जुन्या वाईट अनुभवामुळे स्वतःचे खच्चीकरण करू नका. शरीर स्वास्थ्याकडे नीट लक्ष द्या. तुम्ही आलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहात हा विश्वास ठेवा.
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी थोडा विरंगुळा मिळण्याचा असणार आहे. तुम्ही पूर्वी श्रम केले आहेत, आता या आठवड्यात तुम्हाला त्याचे चांगले परिणाम बघायला मिळतील. तुम्हाला तुमचा स्वतंत्र वेळ मिळेल, या निवांतपणात तुम्ही आत्मपरीक्षण करू शकाल आणि काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करू शकता. तुम्ही भौतिक सुखात आरामात असाल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही काळजी सोडून आनंद घेण्याची गरज आहे. हा वेळ आत्मपरीक्षण आणि स्वतः मधे सुधारणा करण्यासाठी वापरा. जरी तुमच्याकडे चांगली संपन्नता असली तरी वस्तूंचा अतिरेक वापर करू नका. गरजेपुरताच वापर करा. आनंद उपभोगताना अत्यंत विनम्र रहा, जमिनीवर रहा, कसलाही दिखावेपणा करू नका!
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पुष्कळ घडामोडी पटापट घडण्याचा हा काळ असणार आहे. काही लोकांबद्दल तुमचे मत बदलेल. तुमच्या विचारसरणीला धक्का लागू शकतो. विभक्त होणे किंवा फूट पडणे किंवा मतभेद होऊन वाद होणे अशी परिस्थीती निर्माण होऊ शकते पण तुमचे संयम आणि धैर्य तुम्हाला यातून तारून नेईल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात कशीही परिस्थीती आली तरी खचून न जाता, तिला धीराने सामोरे जायचे आहे. लहानसहान भांडणे विकोपाला नेऊ नका, संयम आणि शांतता ठेवा. काही निरुपयोगी गोष्टी सोडून द्या, कचरा टाकून द्या. बदल हाच विश्वाचा नियम आहे आणि यातून काहीतरी चांगलेच होईल हा विश्वास ठेवा आणि त्या बदलत्या गोष्टींत सहभागी व्हा.
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.