साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२४ ते ३० नोव्हेंबर===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी उत्साहाचा आणि आनंदाचा आहे. काहीतरी नवीन शिकायला मिळेल. अडकलेल्या गोष्टी काही प्रमाणात पुढे सरकतील. दुरावलेली नाती जवळ येतील. एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. तुम्हाला समाधान लाभेल. लहान मुलांमध्ये मन रमेल. तुम्हाला आतून सकारात्मक आणि तजेलदार वाटेल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला मुंगी होऊन साखर खाण्याची गरज आहे अर्थात स्वतःकडे कमीपणा घ्या. सगळ्यांना मदत करा, दुसऱ्याचे एखादे काम स्वतःहून करा! लहान मुलं जशी निरागसपणे माफी मागून किंवा माफ करून सोडून देतात तसं तुम्हाला वागण्याची गरज आहे. "चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं" या प्रमाणे मन आनंदी ठेवलंत तर घर आनंदी राहील हे लक्षात ठेवून वागा.
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचं चिंतन आणि मनन करण्याचा आहे. हव्या तशा गतीने गोष्टी पुढे सरकणार नाहीत. एखाद्या गूढ आणि संभ्रम निर्माण करण्याऱ्या प्रसंगाला सामोरे जाऊ शकता. एकाच ठिकाणी स्वस्थ बसून रहाल. पण हे तुमच्या चांगल्यासाठीच असणार आहे. यातून उत्तम निष्पन्न निघेल. नेहमी वेग हाच पुढे वाढण्याचा प्रमाण नसतो, हे लक्षात ठेवा!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कोणत्याही प्रसंगी इतरांकडे धाव घेण्यापेक्षा स्वतः अंतर्मुख होऊन उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. संथपणे आणि शांतपणे काम करा. कमी वेगाने प्रगती करा. विवेक आणि संयम ठेवा. निर्णय घेताना सगळ्या बाजूने विचार करा. ध्यान करा. काही वेळ तरी स्वतः साठी ठेवा.
नंबर ३:
काय घडू शकते? हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन संकल्पना किंवा नवीन विचारांना चांगल्या प्रकारे गती देण्याचा असणार आहे. नवीन काहीतरी सुरू करण्यासाठी अनुकूलता मिळेल. दोन किंवा जास्त गोष्टी हाताशी असतील. तुम्हाला ऊर्जा, सामर्थ्य आणि आत्मविश्वास मिळेल. ध्येय साधनात नियोजन होईल, त्याचा तुम्हाला पुढे फायदा होईल. प्रवास संभवतो.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला काहीतरी नवीन सुरू करायचं असेल तर नक्की करा. अतिविचार करण्यामध्ये वेळ घालवू नका. तुम्हाला आतून योग्य वाटत असलेला निर्णय घ्या आणि त्यावर ठाम राहून वाटचाल करा. कामामध्ये, घरामध्ये ऊर्जेने काम करा, उत्साह ठेवा. जे ठरवाल ते कृतीत आणा. तुम्हाला लोकांचा पाठिंबा आहे याची जाणीव ठेवा.
९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.