>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१३ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट
नंबर १:
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. महत्त्वाचे बदल घडतील. घरातील, कामामधील किंवा परिचयातील लोक वागण्या बोलण्यातून बदलू शकतात. त्यांच्याबद्दल तुमचं मत बदलेल. तुमच्या विचारसरणीला धक्का लागू शकतो. मूलभूत गोष्टींबद्दल अशी माहिती कळेल ज्याने मुळापासून बदल करावा लागेल किंवा होईल. अपेक्षित नसलेल्या अशा काही घटना अचानक घडू शकतात. माणसांपासून काहीसा दुरावा वाटू शकतो. विभक्त होणे किंवा फूट पडणे किंवा मतभेद होऊन वाद होणे अशी परिस्थीती निर्माण होऊ शकते. पुष्कळ घडामोडींचा पटापट घडण्याचा हा सप्ताह असणार आहे.
या आठवड्यात तुम्हाला सकारात्मक ऊर्जेने काम करण्याची गरज आहे. कशीही परिस्थीती आली तरी खचून न जाता, तिला धीराने सामोरे जायचं आहे. लहानसहान भांडणं विकोपाला नेऊ नका, संयम आणि शांतता ठेवा. बदल होत असतील तर ते स्वीकारा, त्यांचा प्रतिकार करायला जाऊ नका. हे बदल चांगल्यासाठीच आहेत. लोकांबद्दल तुमचं वागणं तटस्थ ठेवा. खूप भावनिक गुंतवणूक करू नका. काही निरुपयोगी गोष्टी सोडून द्या, कचरा टाकून द्या, मनावरचं ओझं हलकं करा. सावकाश पद्धतीने वावरा, घाई गडबड नको.
नंबर २:
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. नवीन संकल्पना, नवीन विचार, नवीन पर्याय, नवीन संवाद होणार आहेत. तुम्ही जे करत आहात, किंवा जे करण्याची इच्छा आहे, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. अडकलेले काम सुटेल. वाटेत आलेला अडथळा दूर करण्याचा मार्ग सापडेल. अनुत्तरित प्रश्न सुटतील. स्पष्ट आणि खऱ्या संवादातून काहीतरी मार्ग निघेल. समस्या पूर्ण नाही सुटली तरी ती कशी सोडवता येईल याचा अंदाज येईल. एकूण परिस्थिती सुधारेल. कामामध्ये किंवा घरामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण घडेल. आहात त्यापेक्षा अधिक सक्षम व्हाल.
या आठवड्यात तुम्ही बुद्धीने काम करण्याची गरज आहे. भावना किंवा भौतिक वस्तुंपेक्षा तुम्हाला सारासार विचार करून कुठल्यातरी निर्णयापर्यंत किंवा कुठल्या तरी पर्यायापर्यंत पोचण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी एक वेग ठेवणं गरजेचं आहे. वेळ वाया घालवू नका. लोकांशी तुमचं संभाषण अत्यंत स्पष्ट आणि खरं ठेवा. त्यांना नीट समजावून सांगा. त्यांचं म्हणणं देखील नीट ऐकून घ्या. तुम्हाला एखादा विचार नाही पटला तर निसंकोचपणे सांगा, पण त्यात अरेरावी नको. परखडपणे तुमचं मत मांडा. कुठली नवीन सुरुवात करायची असेल तर करा, विशेष करून ऑनलाईन माध्यमात किंवा संभाषण क्षेत्रात किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याच्या माध्यमात.
नंबर ३:
हा सप्ताह तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. उर्जादायक आणि प्रेरणादायक आहे. सकारात्मक ऊर्जेने घटना घडतील. अडकलेल्या गोष्टी मार्गी लागतील. निराशेकडून नव्या उमेदीकडे घेऊन जाणारा हा काळ आहे. नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये चांगलं यश मिळू शकतं. लोकांना तुमच्या कामाची आणि कर्तृत्वाची माहिती होईल. घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये आनंदाचा प्रसंग येऊ शकतो. तुम्हाला आतून उत्साह वाटेल, काही गोष्टी मनासारख्या नाही जरी घडल्या तरी तुम्ही खचून जाणार नाही. काही लपून राहिलेल्या गोष्टी समोर येतील. तुमच्या ज्ञानात भर पडेल.
या आठवड्यात तुम्हाला सचोटी, खरेपणा आणि प्रामाणिकपणा यांच्या आधारे वागण्याची गरज आहे. अजिबात लपवा लपवी, फसवा फसवी करू नका. पारदर्शी पध्दतीने काम करा. जे आहे ते स्पष्ट आणि सविस्तर समजावून सांगा. एखादी नवीन सुरुवात करायची असेल तर करा. नोकरीमध्ये वरिष्ठांचा आणि घरामध्ये ज्येष्ठ मंडळींचा मान ठेवा. एखादं यश मिळालं असेल तर हुरळून जाऊ नका. कोणालाही कमी लेखू नका. स्वतः स्वतःचं कौतुक करू नका. उलट तुम्ही मोठेपणा घेऊन तुमच्यापेक्षा लहांनाना किंवा तुमच्यापेक्षा कमी असलेल्यांना मार्गदर्शन द्या, त्यांना मदत करा.
श्रीस्वामी समर्थ.