>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१६ ते २२ जून===============
नंबर १:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येत आहे. कामामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती होईल. संथ पण आश्वासक अशी वाटचाल होईल. आर्थिक दृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक आहे. समाधानकारक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात, आरोग्यात, कामात स्थैर्य लाभेल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही काहीतरी नवीन शिकण्यासाठी तयार रहा. येणाऱ्या संधीचे सोने करुन घ्या. मुंगी होऊन साखर खाऊन घ्या. आर्थिक गुंतवणूक विश्वासार्ह ठिकाणी करु शकता. स्वतः थोडा कमीपणा घ्या. लहान गोष्टींमध्ये आनंद माना. आकाशात उडायचे असेल तर आधी पाय जमिनीवर ठेवावे लागतात हे विसरु नका.
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी एक पर्याय निवडीचा आणि त्यावर ठाम राहण्याचा असणार आहे. तुम्हाला दिलेलं काम पार पाडण्यात तुमचा कस लागेल. केलेल्या कष्टांना काही प्रमाणात यश मिळेल. इतरांकडून मदतीचा हात मिळेल. प्रतिसाद चांगला मिळेल. कोणत्याही नात्यात दुरावा आला असेल तर त्यात चांगली सुधारणा होऊ शकते.
या आठवड्यात तुम्ही एका व्यक्तीला, किंवा एका कामाला, किंवा एकाच गोष्टीला तुमचा पूर्ण वेळ देण्याची गरज आहे. एकाच वेळी अनेक कामे हाताळू नका. कामामध्ये चिकाटी आणि धैर्य ठेवा. दिलेला शब्द पूर्ण करा, त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करा. इतरांना सोबत घेऊन पुढे चाला. एकोप्याने आणि चांगल्या भावनेने वागा.
नंबर ३:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी दिलासादायक असणार आहे. तुमचे काम पूर्णत्वाकडे पोचण्याची चांगली शक्यता आहे. तुमच्या शिक्षकांचा, मोठ्या व्यक्तींचा आणि साथीदारांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. काहीतरी नवीन शिकाल आणि शिकवाल. "आधी लगीन कोंढाण्याचे" या प्रमाणे कर्तव्याला न चुकता काम केले तर समाधानकारक फळ मिळेल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही तुमच्या मार्गदर्शक व्यक्तींचा सल्ला अजिबात टाळू नका. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालून तुमचे चांगले होणार आहे. नियमात बसेल असेच वागा आणि त्याप्रमाणे काम करा. जोखीम किंवा चौकटीबाहेरच्या गोष्टींना आत्ता हात घालू नका. आध्यात्मिक गुरुंची उपासना करा.
संपर्क : ९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.