>>सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२८ जुलै ते ३ ऑगस्ट===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी धैर्य आणि संयमाचा कस लावणारा असणार आहे. तुमच्यातील चांगुलपणाची एक प्रकारे परीक्षा होईल. पण तुम्ही जर या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर पुढचा मार्ग निश्चितच सोपा होईल. या काळात तुम्हाला यश मिळवणे अवघड वाटेल. काहीतरी मिळवायला वाट बघावी लागेल. शरीरापेक्षा मनाचे बल महत्त्वपूर्ण ठरेल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही नियमसंयम ठेवून वागलात तर तुम्हाला तुमच्या अपेक्षित ध्येयापर्यंत पोचणे सोपे जाईल. वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवण्याचा हा काळ आहे. राग लोभ मत्सर अशा तमोगुण प्रधान वृत्तीवर शुद्ध सात्विक शांत भावनेने मात करा. सौम्य शांततेचा मार्ग निवडणे म्हणजे सुध्दा एक प्रकारचे धाडसाचे काम आहे हे विसरु नका.
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी तुमच्या हिंमतीचा कस लावणारा असणार आहे. जे काही करत आहात त्यात तुमच्या धडाडीची आणि स्वबळाची परीक्षा होऊ शकते. शेवटच्या टप्प्याजवळ काहीतरी अडथळा येऊ शकतो. थोडा विरोध होऊ शकतो. पण त्यावर मात करण्याची तुमच्याकडे ताकत असेल. म्हणून खचू नका, प्रयत्नांती परमेश्वर ही उक्ती लक्षात ठेवा!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज आहे. जिद्दीने आणि चिकाटीने पुढे चाला. विचारपूर्वक काम करा. कुठल्याही जुन्या वाईट अनुभवामुळे स्वतःचे खच्चीकरण करू नका. शरीर स्वास्थ्याकडे नीट लक्ष द्या. तुम्ही आलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहात हा विश्वास ठेवा.
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी काही अडचणींचा आणि अडथळ्यांचा असणार आहे. कदाचित संभाषण व्यवस्थित होणार नाहीत, व्यवहार चोख होणार नाहीत. ताणतणाव जास्त जाणवू शकतो. पण या सगळ्यात, थोड्या प्रमाणात तुम्ही पुढे वाढणार आहात. परिस्थिती तुमच्या हातात नसेल पण मनःस्थिती नक्कीच तुमची तुम्हीच सुधारू शकता!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या सकारात्मकतेचा कस लावावा लागणार आहे. तुम्ही स्वतःच स्वतःला बांधून घेतले आहे का याकडे लक्ष द्या. न्यूनगंड बाळगू नका. हातपाय गाळून बसू नका. तुमच्याकडे कौशल्य आहे, शक्ती आहे, त्यांचा नीट वापर करा. "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण!" हे तुकोबांचे वचन लक्षात ठेवा!
संपर्क : ९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.