>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१३ ते १९ ऑक्टोबर
नंबर १:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी थोडा अवघड असला तरी हताश होण्याचे कारण नाही. कारण यातूनच तुम्ही सुधारणा करु शकणार आहात. काही प्रमाणत ताण किंवा दडपण येऊ शकते, पण निराश होऊ नका. कामामध्ये शेवटच्या टप्प्यावर तुमची परीक्षा होणार आहे. मनाने भक्कम राहून पुढची वाटचाल केली तर काही प्रमाणात यश मिळेल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही खूप गोष्टी एका वेळी अंगावर घेऊ नका. अतिविचार करणे सोडा. परिस्थिती प्रतिकूल असताना मनाने खंबीर रहा. एकटे पडू नका. चार चौघात बोलून मोकळे व्हा. डोके, डोळे, पाठ, कंबर यांची विशेष काळजी घ्या. गरज वाटत असेल तर विश्रांती घ्या. कोजागरी पौर्णिमेला (Kojagiri Purnima 2024)घरामध्ये देवी उपासना, देवीचा जागर करा!
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी संसाधनांकची मुबलकता घेऊन येत आहे. तुम्ही वस्तू, पैसे, लोक, कौशल्य यांनी युक्त असाल. कामामध्ये लोकांकडून चांगला अभिप्राय मिळू शकतो. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाल. घराबाबत किंवा जमिनीबाबत चांगली घटना घडेल. या कोजागरी निमित्ताने देवी लक्ष्मीची कृपा राहील!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजन नीट करा. कुठे आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर करू शकता. लोकांना मदत करा. सगळ्यांचा सांभाळ करा. व्यावहारिक वागा, पण तुटक वागू नका. वागण्या बोलण्यात धैर्य आणि संयम ठेवा. दानधर्म करा. गृहलक्ष्मीला प्रसन्न ठेवा!
नंबर ३:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी, तुम्ही आहात त्या मार्गावर पुढे नेणारा असणार आहे. बुध्दी पेक्षा भावनांचा पगडा राहील. मध्यम गतीने कामे पुढे सरकतील. लोकांचे यांचे सहकार्य लाभेल. उत्तम नातेसंबंध जोडले जातील. तुम्हाला आतून प्रसन्न वाटेल, दुसऱ्यांना तुम्ही आनंद देऊ शकाल. एखादा छंद किंवा कला यातून तुम्हाला समाधान मिळेल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही लोकांपर्यंत कसे पोचता येईल याचा विचार करायचा आहे. इतरांना तुमच्या बरोबर घेऊन चाला. तुम्हाला कृतीशील होण्याची गरज आहे. तुमच्यातील चांगुलपणाने लोकांचे मन जिंका. पण कोणाच्या कुठल्याही आमिषाला भुलू नका. या कोजागरी पौर्णिमेला चंद्राचे दर्शन नक्की घ्या, नैवेद्य दाखवा आणि उपासना करा!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.