>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२१ ते २७ जानेवारी===============
नंबर १:
हा सप्ताह तुमच्यासाठी वैचारिक गुंतागुंतीचा असणार आहे. अनेकविध विचारांनी मनावर परिणाम होऊ शकतो. निर्णय घेणं अवघड वाटू शकतं. तुम्ही ठरवलेल्या कामात किंवा तुम्ही आखलेल्या नियोजनात फार गती येणार नाही. एक प्रकारची स्तब्धता येऊ शकते. गोष्टी हव्या तशा पुढे सरकणार नाहीत. अकारण विलंब होऊ शकतो.
या आठवड्यात तुम्ही शांत बसून, तोलून मापून विचार करून पुढे जाण्याची गरज आहे. निर्णय घेताना बुद्धीने, सारासार विचार करून घ्या. भावनेच्या भरात किंवा कोणाच्या प्रभावाखाली येऊन काहीही करू नका. एकाग्रपणे काम करा. सगळ्यांच्या सोबतीपेक्षा एकट्याने काम करा. ध्यान, उपासना करा.
नंबर २:
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचं चिंतन आणि मनन करण्याचा आहे. हव्या तशा गतीने गोष्टी पुढे सरकणार नाहीत. एकाच ठिकाणी स्वस्थ बसून रहाल. पण हे तुमच्या चांगल्यासाठीच असणार आहे. यातून उत्तम निष्पन्न निघेल. काहीतरी साधं सरळ पेक्षा एखाद्या गूढ आणि संभ्रम निर्माण करण्याऱ्या प्रसंगाला सामोरे जाऊ शकता.
या आठवड्यात तुम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कोणत्याही प्रसंगी इतरांकडे धाव घेण्यापेक्षा स्वतः अंतर्मुख होऊन उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. संथपणे आणि शांतपणे काम करा. कमी वेगाने प्रगती करा. विवेक आणि संयम ठेवा. निर्णय घेताना सगळ्या बाजूने विचार करा. ध्यान करा. काही वेळ तरी स्वतः साठी ठेवा.
नंबर ३:
हा सप्ताह तुमच्यासाठी उत्साहाचा आणि आनंदाचा आहे. काहीतरी नवीन शिकायला मिळू शकतं. अडकलेल्या गोष्टी काही प्रमाणात पुढे सरकतील. दुरावलेली नाती पुन्हा नव्याने जवळ येतील. एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. समाधान वाटेल. लहान मुलांमध्ये मन रमेल. तुम्हाला आतून सकारात्मक आणि तजेलदार वाटेल.
या आठवड्यात तुम्हाला भावनिक पातळीवर आनंद देणाऱ्या गोष्टी करायच्या आहेत. एखादी कला आत्मसात करा, काही संबंध बिघडले असतील तर त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतः कमीपणा घ्या. इतरांना आनंद द्या. लहान मुलं जशी निरागसपणे माफी मागून आणि माफ करून सोडून देतात तसं तुम्हाला वागण्याची गरज आहे.
श्रीस्वामी समर्थ