साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन३ ते ९ नोव्हेंबर===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी मध्यांतराचा म्हणजेच ब्रेक घेण्याचा असणार आहे. खूप कष्ट करुन, बरेच अडथळे ओलांडून तुम्ही एका टप्प्यावर येऊन पोचल्याने आता तुम्हाला थोडा वेळ तरी आरामाची गरज वाटणार आहे. कामं संथपणे होतील. अपेक्षित उत्तरं, अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. एका जागी थांबून रहाल. पण चुकीचे वळण घेण्यापेक्षा आहे तिथे थांबणे योग्य असते!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला काम थोडं कमी करुन काही प्रमाणात विश्रांती घेण्याचा संदेश दिला जात आहे. आत्ता स्वतःला थोडं मागे ओढा, काढता पाय घ्या आणि स्वतःकडे लक्ष द्या. धावाधाव थांबवा. जमेल तेवढंच काम करा, दडपण घेऊ नका. अतिविचार टाळा. प्रकृतीकडे लक्ष द्या. "मोठी उडी घेण्यासाठी थोडं मागे जावं लागतं" हे लक्षात ठेवा!
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी एका अनपेक्षित घडामोडीचा असणार आहे. महत्त्वाचे बदल घडतील. हे बदल तुमच्या मनाप्रमाणे नसतील आणि तुम्हाला शरणागती पत्करावी लागेल. अपेक्षित ध्येय गाठण्यात अजून वेळ आणि कष्ट लागतील. पण असं असूनही घाबरु नका, हे बदल सुधारणा करण्यासाठी गरजेचे आहेत. "बदल हा निसर्गाचा नियम आहे" हे विसरू नका!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही स्वतःचा अहंकार, गर्व आणि मोठेपणा बाजूला ठेवून वागण्याची गरज आहे. आलेल्या परिस्थितीशी झगडायला जाऊ नका, शांतपणे स्वीकार करा. मागे झालेल्या वाईट घटना विसरण्याचा प्रयत्न करा. अंधार झाल्यानंतरच नवा सूर्योदय होतो आणि अंधारात आपल्याला सोबत करायला एखादी तरी चांदणी नेहमी असते हे लक्षात ठेवा!
नंबर ३:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाच्या वळणाचा असणार आहे. तुमच्या ध्येयाच्या दिशेने चांगली वाटचाल होणार आहे. अडकलेली कामे सुटतील. तुमच्या प्रयत्नांना आणि घेतलेल्या कष्टांना गती मिळेल. इतरांना तुमची नोंद घ्यावी लागेल. योग्य मार्ग सापडेल. मागे केलेले काम मार्गी लागेल. एक प्रकारचा विजय झाला आहे असे वाटेल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामावर तुमच्या ध्येयावर संपूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्याही संभ्रमात विशेष करुन भावनिक गुंतागुंतीत अजिबात न अडकता तुम्ही तुमचे काम सातत्याने करण्याची गरज आहे. कोणताही किंतू परंतू मनात न ठेवता आत्मविश्वासाने पुढे चाला. दृढ संकल्पाने काम करा. "एकला चलो" प्रमाणे वागलात तर इच्छित ध्येय साध्य होईल!
संपर्क : ९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.