>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन११ ते १७ ऑगस्ट===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन उमेद घेऊन येत आहे. मागचं विसरून नवीन सुरुवात करण्यासाठी तयार रहा. एक प्रसन्न आणि उत्साहवर्धक घटना घडू शकते. चांगला सकारात्मक बदल घडू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन संकल्पना सुचतील. तुमच्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे जाल. "आजचा दिवस माझा" असा काळ आहे!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही नवीन काहीतरी सुरू करायचं आहे. तुमच्या मनात सुरू असलेले विचार आणि कल्पना लोकांपर्यंत पोचवा. मोकळेपणाने व्यक्त व्हा. सृजनशीलता बाळगा, वेगळ्या पद्धतीने काम करा. बदल घडत असतील तर ते स्वीकारा. गर्व न करता स्वतःचं केलेलं काम इतरांना दाखवा. आळस सोडलात तर उन्नती होईलच!
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाच्या वळणाचा असणार आहे. तुमच्या ध्येयाच्या दिशेने चांगली वाटचाल होणार आहे. अडकलेली कामे सुटतील. तुमच्या प्रयत्नांना आणि घेतलेल्या कष्टांना गती मिळेल. इतरांना तुमची नोंद घ्यावी लागेल. योग्य मार्ग सापडेल. मागे केलेले काम मार्गी लागेल. एक प्रकारचा विजय झाला आहे असे वाटेल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामावर तुमच्या ध्येयावर संपूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्याही संभ्रमात विशेष करुन भावनिक गुंतागुंतीत अजिबात न अडकता तुम्ही तुमचे काम सातत्याने करण्याची गरज आहे. कोणताही किंतू परंतू मनात न ठेवता आत्मविश्वासाने पुढे चाला. दृढ संकल्पाने काम करा. "एकला चलो" प्रमाणे वागलात तर इच्छित सध्या होईल!
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी डगमग डोलणारा आहे. कुठल्यातरी दोन किंवा अधिक गोष्टींमुळे तुम्ही तारेवरची कसरत करणार आहात. लक्ष एकाग्र न राहता विचलित जास्त होण्याची शक्यता आहे. हवे तसे ध्येय जरी साध्य करायला अवघड असेल तरीही तुम्ही सांभाळत असलेल्या सर्व गोष्टीत तुम्ही पुढे वाढणार आहात आणि हेच महत्त्वाचे आहे!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही कटाक्षाने बघा की आपण दोन दगडांवर पाय ठेवत असताना आपला तोल जात तर नाही ना. आर्थिक निर्णय पुढे ढकला. सगळीकडे उत्तुंग यशाची अपेक्षा ठेवू नका. पण तुम्ही मागच्या आठवड्या पेक्षा निश्चितपणे प्रगत होत आहात हे ध्यानात ठेवा. या सगळ्याचे दडपण न घेता यालाच जीवन ऐसे नाव समजून हा सप्ताह हलकेपणाने घालवा.
९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.