साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१९ ते २५ जानेवारी===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी लोकांबरोबर देवाणघेवाण करणारा असणार आहे. इतरांच्या मदतीने तुम्ही पुढे जाणार आहात. भौतिक किंवा आर्थिक पातळीवर लाभ होऊ शकतात. एक प्रकारची स्थिरता वाटेल. अडकलेले पैसे सुटू शकतात, चांगले आर्थिक व्यवहार होऊ शकतात. एखादे बक्षीस किंवा आवडीची वस्तू भेट मिळू शकते.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही इतरांना मदत करून आणि इतरांच्या मदतीने चालण्याची गरज आहे. अडलेल्या व्यक्तीला केलेली मदत तुम्हाला उपयोगी पडेल. इतरांशी वागताना बोलताना पक्षपातीपणा न करता काम करा. तुमच्याकडे असलेल्या संपन्नतेचा जराही गर्व करू नका. "एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ" प्रमाणे वागा!
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे पण तुमच्या कष्टाचे हवे तसे फळ मिळणार नाही. कुठेतरी काहीतरी अडकेल, विलंब होईल. पण यामुळेच तुम्ही अंतर्मुख व्हाल! आहात त्या परिस्थितीत आनंदाने मार्गक्रमण कराल. निरस व्हाल पण निराश नाही! स्वार्थ सोडून परमार्थाचा विचार येईल. "मन प्रसन्न तर घर प्रसन्न" असा अनुभव येईल!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विवेकबुद्धी, संयम आणि धीराने वागा. आत्मोन्नतीचा मार्ग शोधा. इतरांकडून फार अपेक्षा ठेवू नका. या सगळ्या भौतिक पसाऱ्यातून स्वतःला थोडे अलिप्त करून बघा. एकांतात वेळ घालवा. तुम्ही करत असलेली उपासना सुरू ठेवा, सुंदर अनुभव येतील.
नंबर ३:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा असणार आहे! एखाद्या कामाचा मोबदला चांगला मिळेल. एखादी अपेक्षित घटना घडेल. मागच्या दुःखावर सुखाची फुंकर घालणारा हा काळ आहे. नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. कलेला प्रोत्साहन मिळेल. या सगळ्यात तुम्हाला समाधान वाटेल. "आज मैं ऊपर आसमां नीचे" असं म्हणावंसं वाटेल!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुमच्याकडून कळत नकळत स्वार्थी वागणूक होऊ शकते त्यामुळे ते लक्षपूर्वक टाळा. कुटुंबामध्ये एकोप्याने वागा. तुम्हाला आवडत असणाऱ्या गोष्टीसाठी वेळ काढा. इतरांची विचारपूस करा, सर्वांना तुमच्या आनंदात सहभागी करुन घ्या. कुठल्या नात्यात वितुष्ट आलं असेल तर ते दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.