>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन24 ते 30 डिसेंबर===============
नंबर 1:
हा सप्ताह तुमच्यासाठी मिश्र स्वरूपाचा असणार आहे. तुमच्या ध्येयापर्यंत पोचाल पण तरीसुद्धा समाधान मिळणार नाही. आणखी पुढे काहीतरी करायला हवं अशी भावना येईल. भौतिक सुखसोयींपासून एक प्रकारची विरक्ती येऊ शकते. कंटाळा येऊ शकतो. कामामध्ये विलंब होऊ शकतो. एखादं अवघड वाटणारं ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न कराल, तसं करण्याची इच्छा होईल.
या आठवड्यात तुम्ही तुमच्या मनाशी एकनिष्ठ राहायचं आहे. खरंच तुम्हाला नक्की काय हवं आहे, याचा नीट विचार करा आणि त्याप्रमाणे पुढे चाला. उथळ गोष्टींमध्ये अडकून राहू नका. भावनांमध्ये, भूतकाळात किंवा नैराश्यात अडकून राहू नका. मागे घडलेलं काहीतरी एकदाचं सोडून द्या. कुठेही खूप गुंतू नका. ध्यान, उपासना किंवा मेडिटेशन करा, एकांतात वेळ घालवा.
नंबर 2:
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन संकल्पना, नवीन विचार, नवीन पर्याय, नवीन संवाद घेऊन येत आहे. तुम्ही जे करत आहात, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. वाटेत आलेला अडथळा दूर करण्याचा मार्ग सापडेल. अनुत्तरित प्रश्न सुटतील. स्पष्ट आणि खऱ्या संवादातून काहीतरी मार्ग निघेल. एकूण परिस्थिती सुधारेल. कामामध्ये किंवा घरामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण घडेल.
या आठवड्यात तुम्ही बुद्धीने काम करण्याची गरज आहे. भावना किंवा भौतिक वस्तुंपेक्षा तुम्हाला सारासार विचार करून कुठल्यातरी पर्यायापर्यंत पोचण्याची गरज आहे. एखादी नवीन सुरुवात करू शकता, विशेष करून संभाषण क्षेत्रात. वेळ वाया घालवू नका. लोकांशी तुमचं संभाषण अत्यंत स्पष्ट आणि खरं ठेवा. तुमचं मत परखडपणे निसंकोचपणे मांडा, पण त्यात अरेरावी नको.
नंबर 3:
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन उत्साह, नवीन आनंद, घेऊन येत आहे. तुम्ही जे करत आहात, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. अडकलेले काम सुटेल. मोकळेपणाने तुमच्या भावना व्यक्त केल्या तर चांगला मार्ग निघेल. समस्या पूर्ण नाही सुटली तरी ती कशी सोडवता येईल याचा अंदाज येईल. एकूण परिस्थिती सुधारेल. तब्येत चांगली होईल, औषधांना गुण येईल.
या आठवड्यात तुम्ही बुद्धीपेक्षा मनाने काम करण्याची गरज आहे. तुमचं अंतर्मन काय सुचवत आहे, तुम्हाला आतून काय वाटत आहे ते ऐकण्याची गरज आहे. लोकांशी चांगले, सद्भावनांचे संबंध ठेवा. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. नवीन सुरुवात करायची असेल तर करा, विशेष करून तुमच्या आवडीच्या विषयात. समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. कृतज्ञता बाळगा.
श्रीस्वामी समर्थ.